Headlines

Farhan Akhtar च्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा त्याच्यावर जीव जडला आणि मग…

[ad_1]

Divya Dutta On Farhan Akhtar : ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. द फ्लाईंग शिख म्हणून ओळखले जाणारे भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर तो चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणारी अभिनेत्री दिव्हा दत्तानं नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत हा खुलासा केला की तिनं सगळ्यात आधी या चित्रपटाची ऑफर नकारली होती. तर त्यामागचं कारण देखील तिनं सांगितलं आहे. 

दिव्या दत्तानं खुलासा केला की त्यांनी सगळ्यात आधी या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता. कारण तिला अभिनेता फरहान अख्तरवर क्रश होते. अशात जेव्हा दिव्या दत्ताला फरहानच्या बहिणीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा तिला आश्चर्य झाले आणि तिनं त्यासाठी नकार दिला. कारण दिव्याला तिच्या क्रशच्या बहिणीची भूमिका साकारायची नव्हती. याविषयी बोलताना दिव्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली, ‘मला ती भूमिका साकारायची नव्हती कारण त्यावेळी फरहान माझा क्रश होता. मला असं झालं की मी त्याच्या बहिणीची भूमिका का साकारू. पण राकेशनं मला सांगितलं की मी एक अभिनेत्री आहे. तर तुम्ही प्रोफेशन्ल आहे. मग मी होकार दिला. त्यानंतर अभिनेत्यानं सांगितले की ही भाऊ-बहिणीची कहाणी आहे.’ 

पुढे शूटिंगचे दिवस आठवत दिव्या पुढे म्हणाली, ती एक दिवस आधीच शूटिंगच्या लोकेशलवर पोहोचली होती आणि राकेश ओमप्रकाश मेहरानं तिला सेटवर येण्यास सांगितले. जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा राकेशनं कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवत त्याला मागे वळण्यास सांगितले. तर तो दुसरा कोणी नाही तर फरहान होता. याविषयी बोलताना दिव्या म्हणाली, तो वळला आणि मी म्हणाले की हा फरहान नाही. हा मिल्खा आहे. त्यावेळी तिनं फरहानच्या ट्रान्सफॉर्मेंशनचं कौतुक केलं होतं. 

 ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. त्यात दोन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आहे. त्यात सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

हेही वाचा : ‘दंगल’ फेम अभिनेत्रीबरोबर Delhi Metro मध्ये घडली धक्कादायक घटना, सांगितला ‘तो’ भयावह अनुभव

दरम्यान, या चित्रपटासाठी मिल्खा सिंग यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून फक्त 1 रुपया घेतला होता. त्या आधी त्यांना दुसऱ्या एका दिग्दर्शकाकडून 1.5 कोटींची ऑफर आली होती. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. तर सोनम कपूरनं या चित्रपटासाठी फक्त 11 रुपये मानधन घेतले होते. तर फरहाननं आपण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते द्या असे राकेश यांना सांगत चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे त्यावर काम करूया असे म्हटले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *