Headlines

ठाकरे गट की शिंदे गट, दसरा मेळावा कुणाचा होणार? संभ्रमावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Uddhav Thackeray first reaction on speculations over Shivsena Dasara Melava on Shivaji Park

[ad_1]

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची प्रत्येक शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र, यंदा शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्कवरील हा दसरा मेळावा होणार की नाही आणि झाला तर तो ठाकरे गट घेणार की शिंदे गट घेणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशा संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या संभ्रमावर उत्तर दिलंय. तसेच याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचं म्हणत शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट केलं. ते सोमवारी (२९ ऑगस्ट) मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोणताही संभ्रम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरू केलेली आहे.”

“शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार”

“मुंबई महानगरपालिकेकडून येणाऱ्या परवानगीचा जो तांत्रिक मुद्दा असेल तो त्यांचा ते पाहतील. मात्र, शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले”

उद्धव ठाकरे संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले आहेत. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता हे रोजच चालू आहे.”

“महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही”

“मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.

“बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधव देखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत”

“भाजपाने आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली होती. त्याला छेद देणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या घटना आहे. बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधव देखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होत आहे आणि हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : बंडखोर बांगरांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, संतोष टार्फेंचा शिवसेनेत प्रवेश

“हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत फसल्याचं वाटतं त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे”

“अनेक विषय आहेत. त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तुर्त ज्यांना ज्यांना हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपण फसले गेलो आहोत असं वाटतं त्यांना मातोश्रीचे म्हणजे शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी केवळ शिवसेनेले भक्कम करण्यासाठी नाही, तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं,” असं आवाहनही ठाकरेंनी यावेळी केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *