बनावट आयपीएस अधिकाऱ्याकडून मराठी गायकाची फसवणूक, अशोक निकाळजेंना अडीच लाखांचा गंडाMarathi singer Ashok Nikalje was cheated of Rs 2.5 lakh by two fraud police officers FIR registered

[ad_1]

हाय प्रोफाईल संगीत कार्यक्रमांचे आमिष दाखवून मराठी गायक अशोक निकाळजे यांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करत ४३ वर्षीय निकाळजे यांची दोघांनी अडीच लाखांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात मुंबईच्या टिळक नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

“कुनाचीच नजर नगं लागायला…” ‘मुरांबा’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती पोस्ट चर्चेत

आर्थिक फसवणूक करताना एका आरोपीने चक्क आयपीएस अधिकारी असल्याची थाप मारली होती. एका महिन्याच्या कालावधीत आरोपींनी अनेकदा फोन करून निकाळजे यांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून आरोपीने पहिल्यांदा १४ ऑक्टोबरला निकाळजे यांना फोन केला होता. “लवकरच होणाऱ्या एका संगीत कार्यक्रमात तुम्हाला आमंत्रित करायचे आहे” असे आरोपीने त्यांना म्हटले होते.

“हा चित्रपट अतिशय खराब आणि…” देशभरात कौतुक होत असताना रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’वर प्रसिद्ध दिग्दर्शकाची टीका

या कार्यक्रमासाठी आठ लाख रुपये देण्याचे आश्वासन आरोपीने निकाळजे यांना दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी कनिष्ठ अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा आणखी एक फोन त्यांना आला होता. कार्यक्रमासाठी आठ लाखांचे मानधन मिळवण्यासाठी आधी अडीच लाख रुपये भरावे लागतील, अशी मागणी आरोपीने निकाळजे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पैसे भरल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे निकाळजे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *