Headlines

Test Cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार खेळाडूंच्या नावावर हा विक्रम, भारताच्या एका फलंदाजाचं नाव

[ad_1]

Triple Century In Test Cricket: कसोटी क्रिकेट हा नेहमीच गोलंदाजांचा खेळ मानला जातो. येथे फलंदाजाच्या संयमाची कसोटी लागते. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात क्रिकेट शांतपणे आणि संयमाने खेळले जाते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार फलंदाजांनी दोन त्रिशतके झळकावली आहेत. यात एका भारतीय फलंदाजाचाही समावेश आहे. या चार खेळाडूंची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. चला जाणून घेऊयात

1. डॉन ब्रॅडमन

महान फलंदाज म्हणून डॉन ब्रॅडमनची गणना केली जाते. डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दोन त्रिशतके झळकावली आहेत. त्यांनी आपली दोन त्रिशतके इंग्लंड संघाविरुद्ध झळकावली आहेत. त्यांनी 1934 मध्ये 334 आणि 1930 मध्ये 304 धावा केल्या होत्या. या दिग्गज खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ 52 कसोटी सामने खेळले आहेत. जगभरातील क्रिकेटरसिक सर डॉन ब्रॅडमन यांना आपला आदर्श मानतात.

2. ख्रिस गेल

ख्रिस गेल हा सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने आपल्या फलंदाजीचा पराक्रम दाखवला आहे. गेलने 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 317 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, 2010 मध्ये गेलने श्रीलंकेविरुद्ध 333 धावांची इनिंग खेळली होती. ख्रिस गेल जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळतो. यामुळे त्याचे चाहते जगभरात आहेत.

3. ब्रायन लारा

ब्रायन लाराची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम लाराच्या नावावर आहे. त्याने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावांची इनिंग खेळली होती. 1994 मध्येही लाराने इंग्लंडविरुद्ध 375 धावा केल्या होत्या. लारा त्याच्या स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो.

4. वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवागची गणना भारताच्या धोकादायक फलंदाजांमध्ये केली जाते. सेहवाग T20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेट खेळला. सेहवागचे पहिले त्रिशतक 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध होते. मुलतानच्या मैदानावर त्याने 309 धावांची इनिंग खेळली. त्याच वेळी, दुसरे त्रिशतक, त्याने 2008 मध्ये चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलं असून 319 धावांची इनिंग खेळली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *