Headlines

तीन लग्न करणारी अभिनेत्री आयुष्यभर प्रेमासाठी आसुसली; मृत्यूही असा की सगळेच चक्रावले

[ad_1]

मुंबई : दिसतं तसं नतसं म्हणून जग फसतं… असं म्हणतात. बऱ्याचदा ही ओळ पटते. कारण, अनेकदा जगासाठी दिसणारं दृश्य कितीही लाघवी असलं तरीही त्याच्यामागे असणारं सत्य मात्र कायमच हादरा देत असतं. असंच काहीसं एका अभिनेत्रीच्या बाबतील घडत होतं. 

ती समोर आली, की अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकत होता. कलाजगतामध्ये एक वेळ तर अशी आली, की तिची ओळख Sex Symbol म्हणून झाली होती. आपल्या मादक सौंदर्याच्या बळावर तिनं असंख्यजणांच्या काळजाचा ठाव घेतला होता. पण, ती मात्र आयुष्यभर खऱ्या प्रेमासाठी आसुसली. 

थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांशी या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं होतं. तिच्या आयुष्यात बरेच पुरुष आले. पण, कुणीच तिला कायमस्वरुपी साथ दिली नाही. आयुष्याचा करुण अंत होऊनही तिचा मृत्यू एक रहस्यच ठरला. ही अभिनेत्री म्हणजे मर्लिन मुनरो (Marilyn Monroe). (hollywood actress marilyn monroe life unsuccessfull relationships movies photos )

मर्लिननं तिच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच अडचणींचा सामना केला. बरेच चित्रपट तिनं गमावले. पुढे एजंट जॉनी हाईड (Johnny Hyde) च्या रुपात तिला मार्गदर्शक आणि प्रेम मिळालं. हाईडनं तिला बऱ्याचदा प्रेमासाठी प्रपोज केलं पण प्रत्येक वेळी तिनं नकार दिला. कारण तिचं संपूर्ण लक्ष करिअरवर होतं. 

यशशिखरावर असतानाच वादळ आलं आणि… 
मर्लिन यशाच्या शिखरावर असतानाच तिच्या आयुष्यात वादळ आलं. एक म्हणजे तिचं न्यूड फोटोशूट आणि दुसरं म्हणते ज्या आईचं निधन झाल्याचं ती सांगत होती तिची तिच आई हयात असल्याचा खुलासा. ही तिच वळणं होती जिथं आल्यावर मर्लिनची कारकिर्द उतरणीवर आली होती. 

परिस्थितीला ती धीरानं सामोरी गेली आणि पैशांसाठी फोटोशूट केल्याचं सांगत आई हयात असल्याची माहिती तिच्याच सुरक्षिततेसाठी लपवल्याची खरी कारणं तिनं जगासमोर आणली. मर्लिनचा प्रामाणिकपणा अनेकांना भावला आणि ती पुन्हा लोकप्रिय झाली. 

पुढे चांगल्या भूमिकांच्या प्रतिक्षेत असतानाच मर्लिन सॅन फ्रान्सिस्कोला पळून गेली आणि तिथं तिनं  जो डीमागियो (Joe DiMaggio)शी लग्न केलं. पण, ‘द सेवन ईयर इच’ या चित्रपटानं तिच्या वैवाहिक जीवनात वादळ आणलं. हा तोच चित्रपट ठरला ज्यामुळं तिचं दुसरं लग्न तुटलं. 

या चित्रपटात प्रसिद्धीसाठी मर्लिनचा स्कर्ट उडत असल्याचं दाखवण्यात येणार होतं. दृश्याच्या चित्रीकरणावेळी तिचा पतीसुद्धा तिथं हजर होता. आपल्या पत्नीकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन त्याला खटकला. यानंतर त्या दोघांमध्येही पराकोटीचा वाद झाला आणि त्याचा शेवट नात्याला पूर्णविराम लागण्याच्या रुपात झाला. 

Marilyn Monroe | Zee News

1955 पासून ती न्यूयॉर्कमध्ये राहण्यास आली. हा काळ तिनं आपल्यावर मेहनत घेण्यात घालवला. रंगभूमीतील बारकावे ती शिकत होती. इथंच तिची भेट तिसरा पती आणि नाट्यलेखक आर्थर मिलर (Arthur Miller) यांच्याशी झाली. 

1956 मध्ये त्यांनी लग्न केलं. मर्लिनला आई व्हायचं होतं. पण, अनेकदा तिचा गर्भपातही झाला होता. ‘सम लाइक इट हॉट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही तिचा गर्भपात झाला होता. मर्लिन बऱ्याच डॉक्टरांचेही सल्ले घेत होती. अखेर 1959 मध्ये शस्त्रक्रियेनंतर तिनं हे स्वप्न मागे सोडलं. 

मिलरसोबतचं तिचं नातं तेव्हा तुटलं जेव्हा त्यानं ‘द मिसफिट्स’ चित्रपटासाठी मर्लिनची भूमिका लिहिली. चित्रपटातील पात्र अतिशय खासगी होती. त्याचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत मर्लिन पुन्हा आय़ुष्याच्या या वाटेवर एकटी पडली होती. मर्लिन नैराश्याच्या गर्द झाडीत अडकली होती. तिच्यासाठी कठीण काळ तो होता जेव्हा अभिनेता गेबलच्या पत्नीनं त्याच्या मृत्यूचा ठपका तिच्यावर लावला होता. 

Marilyn Monroe: A bombshell, a feminist

तो परत आला होता… 
जो डीमागियो मर्लिनच्या आयुष्यात तेव्हा परतला होता जेव्हा खरंच तिला कोणाच्यातरी आधाराची गरज होती. त्या दोघांनी बराच काळ एकत्र व्यतीत केला. अनेकांना तर वाटत होतं की त्यांचं नातं पुन्हा नव्यानं आकारास येत आहे. पण, मर्लिनच्या मनातलं वादळ कोणालाच ठाऊक नव्हतं. 

ऑगस्ट 1962 मध्ये 4 तारखेला मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. औषधांची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यामुळं तिचा मृत्यू झाला होता. त्या दिवशी खळखळून हसणारी, बागडणारी मर्लिन म्हणजेच अंतर्मनातून वेदनेनं विव्हळणारी नॉर्मा जीन जगाचा निरोप घेऊन गेली होती. सोबत आयुष्याशी संबंधित सर्व प्रश्न अनुत्तरितच ठेवून गेली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *