Headlines

टीम इंडियातील स्टार खेळाडूमुळे श्रेयस अय्यरचं करिअर धोक्यात?

[ad_1]

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजमध्ये श्रेयस अय्यरची आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. त्याच्या जागी धोकादायक फलंदाज सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली. 

आयर्लंडविरुद्धच्या या टी-20 सीरिजमध्ये सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्याच्या कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमार यादव टीम इंडियातील श्रेयस अय्यरची जागा पटकावू शकतो.

रोहित शर्मासारखा घातक खेळाडू म्हणून सूर्यकुमारकडे पाहिलं जातं. तो टीम इंडियातला हुकमी एक्का आहे. मॅच पलटवण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. सूर्यकुमार यादवची बॅट आता चालली तर त्याचं टी 20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये स्थान निश्चित होईल आणि श्रेयस अय्यरची जागा धोक्यात येऊ शकते. 

शॉर्ट पिच बॉलवर खेळण्यात सूर्यकुमार माहीर आहे. तर श्रेयस अय्यरची तिथे दांडी गुल होते. त्यामुळे त्याला टीम इंडियात मोठा फटका बसू शकतो. कारण अय्यरला सूर्यकुमार तगडी टक्कर देत आहे. श्रेयस अय्यरचं टी 20 क्रिकेटमधील टीम इंडियाचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 351 धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर या खेळाडूला टीम इंडियामध्ये सतत खेळण्यासाठी संधी दिली. त्यानंतर या खेळाडूनं टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोठा हातभार लावला. सूर्यकुमार यादवने वनडे आणि टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये आपलं स्थान पक्क केलं. 

सूर्यकुमार यादवने भारतासाठी 7 वनडे आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कमी बॉलमध्ये जास्त धावा देणारी त्याच्या स्टाइलने त्याने सर्वांची मनं जिंकून घेतली. कमी बॉलमध्ये जास्त धावांची गरज पूर्ण करणारा तो एक महत्त्वाचा खेळाडू बनला. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये श्रेयस अय्यर पूर्णपणे फ्लॉप ठरला. आता आयर्लंडविरुद्ध सूर्यकुमारला श्रेयसच्या जागी संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर टीम इंडियातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनंही हा सामना सूर्यकुमारसाठी महत्त्वाचा असेल. 

भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश सिंह, अरशदीप सिंह, आर. उमरान मलिक.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *