टीम इंडियाच्या खेळाडूला धमकावणाऱ्या पत्रकाराविरोधात मोठी कारवाई?


मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूला धमकावणं पत्रकाराला महागात पडणार आहे. बीसीसीआय (Bcci) या पत्रकारावर 2 वर्षांची बंदी घालू शकते. बोरिया मजूमदार (Boria Majumdar) या पत्रकाराने काही महिन्यापूर्वी धमकावल्याचा आरोप विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने केला होता. साहाने ट्विट करत व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यानंतर या सर्व वादाला तोंड फुटलं होतं. (bcci will take big action against journalist boria mujumdar likely to get 2 years banned in wriddhiman saha case)

साहाने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बीसीसीआयने सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली.  

या समितीने अहवाल तयार केला. तो अहवाल बीसीसीआयसमोर ठेवला. या समितीच्या अहवालात मजुमदार साहाला धमकावण्याच्या प्रकरणात दोषी आढळला. 

त्यामुळे आता मजुमदारला भारतातील कोणत्याच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्याला आता या पुढे खेळाडूंना भेटताही येणार नाही.

साहाने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने इंटरव्यू देण्यास नकार दिल्याने पत्रकाराने धमकी दिल्याचा आरोप केला होता. 

“आम्ही बीसीसीआयच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व राज्यातील क्रिकेट बोर्डांना स्टेडियममध्ये मजुमदारला प्रवेश न देण्याबाबतच्या सूचना देणार आहोत. मजुमदारला मीडिया एक्रेडेशन देण्यात येणार नाही. तसेच त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं, यासाठी आयसीसीलाही पत्र लिहिणार. तसेच खेळाडूंनी त्याच्यासह काम करु नये, असं सांगणार आहोत”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 

त्यामुळे आता मजुमदारवर बीसीसआय किती वर्षांची बंदी घालणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

 Source link

Leave a Reply