टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांच्यातील Chat व्हायरल, फोटोची एकच चर्चा


मुंबई : अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील लव्हरिलेशन आपल्यासाठी काही नवीन नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यापूर्वी क्रिकेटर्सना डेट करत होता. परंतु काहींचं नातं पुढे जाऊ शकलं नाही, तर अनेकांनी लग्न देखील केलं आहे. या सगळ्यात आता टीम इंडियामधील आणखी एका खेळाडूचं नाव समोर आलं आहे. ज्याचं नाव साउथच्या एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. या दोघांमधील एक छोटासा संवाद समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

टीम इंडीयासाठी आणि आत सध्या कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळणारा स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि साउथची सुंदरी प्रियांका जवळकर या दोघांमधील संवाद समोर आला आहे.

व्यंकटेश तसा फारसा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी, तेलगू अभिनेत्री प्रियांका जवळकरच्या एका पोस्टवर त्याने कमेंट केली आहे. त्यावर अभिनेत्रीनं देखील एक रिप्लाय केला. या दोघांमधील या संभाषणाची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे. ज्यामुळे आता हे दोघेही एकमेकांना ओळखतात आणि ते खूप चांगले मित्र आहेत, ही बातमी समोर आली आहे. त्यात आता हे दोघेही आपल्या चाहत्यांना काहीतरी गोड बातमी देतील अशी लोकांची चर्चा सुरु आहे.

खरेतर जेव्हा प्रियांकाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावर कमेंट करताना अय्यरने लिहिले – ‘क्यूट’ एखाद्या अभिनेत्रीला स्टार क्रिकेटरने अशी कमेंट करणं हे नेटकऱ्यांना पटलेलं नाही. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे असं देखील ते म्हणू लागले आहेत.

एवढंच नाही तर प्रियांकाने व्यंकटेशच्या कमेंटला उत्तर दिले, ‘कोण? तू?’

व्यंकटेशच्या कमेंटला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर त्याच्या फक्त कमेंटवर 2000 हून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरनेही गेल्या मोसमात खूप नाव कमावले होते. अय्यरला आयपीएलच्या 14व्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर अय्यरने सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली. अय्यरने गेल्या आयपीएल हंगामात 10 सामने खेळले, 41.11 च्या सरासरीने 370 धावा केल्या, त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर या सिझनसाठी केकेआरने या युवा अष्टपैलू खेळाडूला ८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.

परंतु व्यंकटेश अय्यर या मोसमात आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. अय्यरने या मोसमात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यात 9.67 च्या सरासरीने केवळ 29 धावा केल्या आहेत. गेल्या 3 सामन्यात त्याने फक्त 16, 10 आणि 3 धावा केल्या आहेत.Source link

Leave a Reply