Headlines

Team India : टीम इंडियातून ‘मॅच विनर’ खेळाडूला डच्चू

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी विंडिज दौऱ्यावर  (Team India Tour Of West Indies 2022) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20  मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने वनडे पाठोपाठ आता टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने एकूण 18 खेळाडूंची निवड केली आहे. या मालिकेसाठी 3 खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर एका मॅचविनर खेळाडूला डच्चू देण्यात आला आहे. ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकला (Umran Malik) निवड समितीने संधी दिली नाही. (bcci selection committee dose not give chance to umran malik against to upcoming west indies t 20i series)

उमरान मलिकला आयपीएलच्या 15 व्या मोसमातील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी देण्यात आली होती. मात्र त्याला आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे उमरानला वगळण्यात आलंय.

इंग्लंड-आयर्लंड विरुद्ध फ्लॉप 

उमरानला इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यावर 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र तो फ्लॉप ठरला. उमरानला फक्त 2 विकेट्स घेण्यातच यश आलं. उमरानचा इकॉनमी रेट हा 12.44 इतका होता, म्हणजेच त्याने प्रत्येक ओव्हरमध्ये 12.44 इतक्या धावा लुटवल्या. उमरानने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात  4 ओव्हरमध्ये 56 दिल्या होत्या. 

रोहित शर्माकडून कौतुक

कॅप्टन रोहित शर्माने नुकतंच उमरानचं कौतुक केलं होतं. “उमरान आमच्या रणनितीचा भाग आहे. त्याच्यासाठी जे महत्त्वाचं आहे, आम्ही त्याला तेच देण्याचा प्रयत्न करतोय. एक वेळ येईल जेव्हा आम्ही युवा खेळाडूंना संधी देऊ. आम्ही हे सर्व प्रयोग आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर करु इच्छितो”, असं रोहित म्हणाला होता. मात्र आता उमरानला वगळण्यात आलं आहे.

विडिंज विरुद्धच्या टी20 सीरीजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिं



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *