Headlines

Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी (IND vs SL 2nd Test)  सामना बंगळुरुत सुरु आहे. कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. मात्र या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. (indian cricket team star player manprit juneja announced retirment) 
 
या खेळाडुचा निवृत्तीचा निर्णय

गुजरातचा बॅट्समन मनप्रीत जुनेजाने (Manprit Juneja) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली. जीसीएने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढलंय. “गुजरात क्रिकेट टीमच्यावतीने मनप्रीतला त्याच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत आहोत. मनप्रीतने 9 मार्चला निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं”, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. 

मनप्रीतने टीम इंडिया ए आणि अंडर 23 टीम इंडिया या दोन संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच मनप्रीतने स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरातचं प्रतिनिधित्व केलंय. तसेच मनप्रीत आयपीएलमध्ये दिल्ली आणि हैदराबादकडून खेळला आहे.  

मनप्रीतने 69 प्रथम श्रेणी सामन्यात 4 हजार 265 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 9 शतक आणि 25 अर्धशतकं झळकावली आहेत. मनप्रीतची नाबाद 201 ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.

मनप्रीतने 2011 मध्ये तामिळनाडू विरुद्ध पदार्पण केलं होतं. मनप्रीतने गुजरातला 2016-17 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *