Headlines

Team India Schedule: 28 दिवसांत 13 सामने खेळणार टीम इंडिया; पाहा कसं आहे शेड्यूल

[ad_1]

Team India Schedule: नवीन महिना सुरु झाला असून टीम इंडिया (Team India) त्यांच्या नव्या मिशनची वाट बघतेय. गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडिया सतत क्रिकेट (Cricket) खेळताना दिसतेय. आणि या नव्या महिन्यात देखील टीम इंडियाचं बिझी शेड्यूल (Busy Schedule) असंच राहणार आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात टीम इंडियासमोर अनेक नवीन आव्हानं आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सिरीज आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सामन्यांचा समावेश आहे.  

केवळ पुरुष क्रिकेट टीम नाही तर महिला क्रिकेट टीमसमोर देखील अनेक आव्हानं आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी महिला टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. नुकतंच महिलांच्य़ा अंडर०-19 टी-20 क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला असून वनडे  वर्ल्डकपसाठी आता टीमच्या आशा वाढल्या आहेत. 

28 दिवसांत खेळणार 13 सामने

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी काही कमीच दिवस असणार आहेत, ज्या दिवशी त्यांना क्रिकेट सामन्याचा आनंद घेता येणार नाहीये. टीम इंडिया फेब्रुवारीमध्ये तब्बल 28 दिवसांपैकी 13 दिवस सामने खेळणार आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी फेब्रुवारीचा महिना मेजवानीपेक्षा कमी नाहीये.

भारतीय पुरुष क्रिकेट टीमचं शेड्यूल (फेब्रुवारी)

1 फेब्रुवारी- टी-20 विरूद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद
9 ते 13 फेब्रुवारी- पहिला टेस्ट विरूद्ध ऑस्ट्रेलिया, नागपुर
17 ते 21 फेब्रुवारी, दुसरी टेस्ट विरूद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली

भारतीय महिला क्रिकेट टीमचं शेड्यूल (फेब्रुवारी)

2 फेब्रुवारी- भारत विरूद्ध दक्षिण आफ्रीका, त्रिकोणीय सीरीज
6 फेब्रुवारी- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, वॉर्म-अप मॅच
8 फेब्रुवारी- भारत विरूद्ध बांग्लादेश, वॉर्म-अप मॅच
12 फेब्रुवारी- भारत विरूद्ध पाकिस्तान, टी-20 वर्ल्ड कप
15 फेब्रुवारी- भारत विरूद्ध वेस्टइंडीज, टी-20 वर्ल्ड कप
18 फेब्रुवारी- भारत विरूद्ध इंग्लंड, टी-20 वर्ल्ड कप
20 फेब्रुवारी- भारत विरूद्ध आयरलंड, टी-20 वर्ल्ड कप

टीम इंडिया जर क्वालिफाय झाली तर…

23 फेब्रुवारी- सेमीफायनल 1, टी-20 वर्ल्ड कप
24 फेब्रुवारी- सेमीफायनल 2, टी-20 वर्ल्ड कप
26 फेब्रुवारी- फायनल, टी-20 वर्ल्ड कप  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *