Headlines

WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

[ad_1]

WTC Final 2021-23: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021-23 च्या फायनल सामन्यात नेमके कोणते संघ खेळणार आहेत. याबाबत अद्याप स्पष्ट निकाल समोर आला नाही. याबाबतचा निकाल पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतर्गत तीन मालिका शिल्लक आहेत. ज्यामध्ये एकूण 8 सामने खेळवले जाणार आहेत. हे 8 सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कोणते संघ जाणार आहेत, हे ठरवणार आहेत. दरम्यान टीम इंडियाला (Team India) फायनल गाठण्याची किती संधी आहे? हे जाणून घेऊयात. 

पॉइंट टेबल काय?

टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्द टेस्ट मालिका फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे. तत्पुर्वी सध्याच पॉइंट टेबल कसे आहे ते जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया (75.56%) गुणासह पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ (58.93%) गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship)अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत. या दोन संघांमध्ये फेब्रुवारीमध्ये सुरू होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final)  फायनलच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे.  WTC गुणतालिकेत श्रीलंका सध्या तिसऱ्या क्रमांकावर (53.33%) आहे आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर (48.72%) आहे. 

…तर टीम इंडिया फायनलमध्ये

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-3 ने हरली तरी ते अंतिम फेरीत पोहोचतील. मात्र, 0-4 ने पराभव झाल्यास अशा पराभवामुळे त्याला इतर संघांच्या सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने ही मालिका 3-1 ने जिंकली तर अंतिम फेरीतही पोहोचेल. जर तसे न झाल्यास भारतीय संघाला इतर दोन मालिकांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड

श्रीलंका आणि न्यूझीलंड  (Sri lanka vs New Zealand) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.  WTC गुणतालिकेत श्रीलंका सध्या तिसऱ्या क्रमांकावर (53.33%) आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपेक्षित निकाल (3-1) साधता आला नाही, तर श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडकडून कोणत्याही प्रकारे कसोटी मालिका जिंकू शकणार नाही, अशी आशा बाळगावी लागेल. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी मालिका गमावल्यास भारताला न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेच्या पराभवाचीही आशा बाळगावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये  (South Africa vs west Indies) दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.  WTC गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर (48.72%) आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा विजय नोंदवू शकला नाही, तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज मालिकेचा निकाल आपल्या बाजूने येईल अशी आशा बाळगावी लागेल. म्हणजे, एकतर तो ड्रॉ होईल किंवा वेस्ट इंडिज 1-0 ने जिंकेल.

दरम्यान या सर्व शक्यता अशक्यता आहेत. त्यानुसार संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे आता या मालिका पार पडल्यावरच निकाल स्पष्ट होणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *