Headlines

Team India: ‘…म्हणून रोहितने मला बॉलिंग दिली नाही’, व्यंकटेश अय्यरचा मोठा गौप्यस्फोट!

[ad_1]

Venkatesh Iyer On Rohit Sharma: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाला सर्वाधिक कमी जाणवली ती गोलंदाजांची. मोक्याच्या क्षणी मैदानात उतरून कमाल करून दाखवणारे गोलंदाज टीम इंडियामध्ये (Team India) फार कमी आहेत. वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स खेळाडूंची देखील कमतरता दिसून आली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये ऑलराऊंडर्स (All rounders) खेळाडू जास्त असावेत, अशी प्रतिक्रिया क्रिडातज्ज्ञांनी वर्तविली होती. इंडियाला सलामीवीर अष्टपैलू खेळाडूची गरज होती. त्यात नाव होतं ते व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांचं…

टीम इंडियातून बाहेर पडणाऱ्या अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) भारतीय संघासाठी आतापर्यंत 9 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत, परंतु त्याला आतापर्यंत केवळ 4 टी-ट्वेंटी आणि 1 वनडे सामन्यात गोलंदाजी करता आली आहे. त्याची गगना ही सलामीवीर म्हणून करण्यात येत होती. मात्र, मिडियम पेसर व्यंकटेश अय्यरने बॉलिंग (Venkatesh Iyer Bowling) करताना कमाल करून दाखवली होती. अशातच अय्यरला बॉलिंग का दिली नाही?, यावर खुद्द अय्यरने रोहित शर्माचा (Rohit Sharma) उल्लेख करत मोठं वक्तव्य केलंय. (venkatesh iyer reveals why captain rohit sharma did not show faith in his bowling sports marathi news)

व्यंकटेश अय्यर काय म्हणाला?

खरं सांगायचं तर, मलाही थोडंसं वाटलं की मी कमी गोलंदाजी केली. परंतु जेव्हा मी कॅप्टनच्या (Captain Rohit Sharma) दृष्टिकोनातून याबद्दल विचार करतो, तेव्हा तुम्हाला माहित आहे की पाच गोलंदाज त्याचं काम करत आहेत, त्यामुळे सहाव्या बॉलरला गोलंदाजीला पाठवणं योग्य नाही. मी यापूर्वी माझ्या राज्य संघांचं नेतृत्व केलंय. सहाव्या गोलंदाजीचा पर्याय ठेवणं आवश्यक आहे, असं व्यंकटेश अय्यर म्हणाला आहे.

आणखी वाचा – IND vs NZ ODI : Kane Williamson ची कॅप्टन इनिंग, पहिल्या वनडेत भारताचा 7 विकेट्सने पराभव

दरम्यान, तुमचे 5 गोलंदाज चांगलं काम करत असतील तर 6 व्या गोलंदाजाचा वापर करणं योग्य नाही, तोच विचार रोहित शर्माने (Rohit Sharma) केला असावा. मला माझं मत विचाराल तर मला टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये 20 ओव्हर बँटिंग करणं आणि 4 ओव्हर बॉलिंग करणं आवडेल. मात्र, ते सध्या अशक्य आहे, असंही अय्यर म्हणाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *