Headlines

Team India : हरमनप्रीतला अचानक काय झालं? गोस्वामीच्या गळ्यात पडून का ढसाढसा रडली??

[ad_1]

Jhulan Goswami : भारत आणि इंग्लंड (Ind VS Eng) महिला संघाचा तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी खेळला जात आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत अखेरचा सामना इंग्लंडसाठी महत्त्वाचा असणार आहे. या सामना आणखी खास राहिलाय, त्याला कारण म्हणजे भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा (Jhulan Goswami Farewell) फेअरवेल… (Captain sheds tears while bidding farewell to Goswami Harmanpreet cried profusely)

झुलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हा शेवटचा सामना होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम देखील झुलनच्या नावावर आहे. सामन्याआधी झुलनचा निरोप समारंभ पार पडला. त्यावेळी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

झुलन गोस्वामीच्या जबरदस्त आंतरराष्ट्रीय कारकीर्दीसाठी तिचा खास सन्मान केला गेला. भारतीय संघाकडून तिला स्मृतिचिन्ह भेट दिली गेली. भारतीय संघासाठी हा भावूक क्षण होता. त्यामुळे कर्णधार कौरला अश्रू अनावर झाले आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यावेळी ढसाढसा रडली.

Jhulan Goswami काय म्हणाली?

झुलन गोस्वामी देखील काही वेळ भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “बीसीसीआय, बंगाल क्रिकेट संघ, माझं कुटुंब, कोच आणि कॅप्टन यांचे खास आभार. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद, हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी 2002 साली इंग्लंड विरूद्ध माझ्या कारकीर्दीची सुरूवात केली होती आणि आज इंग्लंड विरूद्धच मी माझ्या कारकीर्दीचा शेवट करत आहे. संघासोबतचे प्रत्येक क्षण माझ्या स्मरणात राहतील”, असं गोस्वामी म्हणाली.

दरम्यान, झुलन गोस्वामी म्हणजे भारताची (Team India) स्टार गोलंदाज. 19 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करत अनेकांना आपल्या धारदार गोलंदाजीने प्रभावित केलं. भारतीय झुलन गोस्वामीने संघाला अनेक मोक्याच्या क्षणी सामाना जिंकवून देखील दिले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *