‘तारक मेहता…’ मालिकेसंदर्भातील सर्वात मोठी Update; अपेक्षा नसताना शैलेश लोढा हे काय म्हणून गेले ?


मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिके प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. या प्रकरणावर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता शैलेश लोढा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

‘तारक मेहता…’ हे पात्र मालिकेतील महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक आहे. शैलेश लोढा यांनी तर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जय-वीरूची जी जोडी आपण पाहिली ती जोडी तारक मेहता मालिकेत तारक-जेठालालची आहे. त्यामुळे शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. गेले बरेच दिवस याबद्दल उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच यावर कार्यक्रमाचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच लवकरच या मालिकेत नवीन तारक मेहता झळकणार असल्याची माहिती दिली. त्यावर आता शैलेश लोढा यांची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashma shailesh-lodha-cryptic-post after Producers asit modi Statement Goes Viral Says The Serial Wont Stop For Them

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चा एक फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ‘तुझ्या माझ्या नात्याचा हाच हिशोब, मी ह्रदय आणि तू नेहमी हृदय राहिला. #शैलेश की शैली.’ असे कॅप्शन शैलेश लोढानं दिले आहे. शैलेशच्या या पोस्टची चाहते दखल घेत आहेत. शैलेशच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्यानं पुन्हा तारक मेहता मालिकेत परतावे. त्याचा निर्मात्यांशी जो काही वाद असेल तो सोडवला पाहिजे. तसे, शैलेश टीव्हीच्या पडद्यावरून गायब झाला नसल्याचे समाधान चाहत्यांना आहे. ‘तारक मेहता…’मध्ये तो दिसला नाही तर काय, तो त्याच्या नवीन शो ‘वाह भाई वाह’मध्ये चाहत्यांचे मनोरंजन करतो.

काय म्हणाले असित मोदी? 
असित कुमार मोदी यांनी ‘तारक मेहता’ पात्राचे आता काय होणार यावर स्पष्ट वक्तव्य दिले आहे. ते म्हणाले, ‘जसं मी याआधी देखील सांगितलं आहे, मला सर्वांना एकत्र घेऊन काम करणं आवडतं. पण काही जणांना जर असं वाटत असेल की त्यांचं हे काम करून मन भरलं आहे, त्यांनी यात खूप काही केलं आहे, आता नवीन काही करण्याची गरज आहे. त्यांना असं वाटत असेल की आमच्याकडे टॅलेंट आहे. आम्ही दुसरं काहीही करु शकतो. त्यामुळे आम्हाला फक्त ‘तारक मेहता..’मध्येच अडकून राहायच नाही, तर त्यांनी यावर परत एकदा विचार करावा’, असे सांगितलं आहे. 

पुढे असित म्हणाले, ‘त्यांची मालिका सोडण्याची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी मालिका थांबणार नाही. नवीन तारक मेहता नक्की येतील. जुने तारक मेहता आले तरी आनंद आहे आणि नवे तारक मेहता आले तरी आनंद आहे. फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हा माझा उद्देश आहे.’ त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.Source link

Leave a Reply