Headlines

“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान | Shivsena rebel MLA sanjay shirsat on uddhav thackeray photo remove from office rmm 97

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. बंडखोर आमदारांनी सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. त्याजागी आनंद दीघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावले आहेत.

शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो हटवल्यानंतर ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. फोटो हटवल्यानंतर स्पष्टीकरण देताना शिरसाट म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांचा फोटो माझ्या कार्यालयात नव्हता. उद्धव ठाकरेंचा फोटो जरूर होता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फोटो असतो. तुम्ही कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला माझाही फोटो कुठे दिसणार नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात असणं अत्यावश्यक आहे.”

हेही वाचा- “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

“राहिला प्रश्न शिवसेनाप्रमुखांच्या फोटोचा, तर ते आमच्या हृदयस्थानी आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच तुम्हाला शिवसेनाप्रमुखांचा फोटो दिसेल आणि तो आयुष्यात कधीही तेथून हलणार नाही. कारण त्या शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला मोठं केलं आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळेच आम्ही मोठे आहोत” असंही शिरसाट म्हणाले.

हेही वाचा- पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्तेच आजच होणार होतं उद्घाटन पण…

उद्धव ठाकरेंना उद्देशून शिरसाट पुढे म्हणाले, “आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून तुम्ही रोजच आमची हेटाळणी करत असाल तर, आम्ही त्यांच्या फोटोकडे पाहून काय समजायचं? अरे हे… आम्हाला गद्दार म्हणतात, हे आम्हाला बंडखोर म्हणतात, हे आम्हाला विकलेले म्हणतात, असं सगळं पाहून आम्ही त्यांना अपेक्षित धरायचं का? ज्यादिवशी ते चांगलं बोलायला लागतील, तेव्हा त्यांचाही फोटो कार्यालयात लावण्यात येईल.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *