Headlines

“…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा | uday samant car attack chandrakant khaire says if you insult our leaders shivsainik will not tolerate scsg 91

[ad_1]

शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या हल्ल्याला समर्थन नसल्याचं म्हटलंय. मात्र त्याचवेळी त्यांनी बंडखोरांना इशाराही दिलाय.

नक्की वाचा >> Photos: आपल्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी पाहून शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणतात, “मी शिवसेनेत प्रवेश…”

शिवसैनिक सहन करणार नाही
“हल्ल्याचं समर्थन मी करणार नाही. पण हल्ला का होतो? जो उठतो तो फुटीर आमदार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर बोलायला लागलाय,” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. पुढे खैरे यांनी, “एक तर तुम्ही फुटले त्यात तुम्ही पक्षाच्या नेत्यांबद्दल असं उलटं बोलता. शिवसैनिक सहन करणार नाही,” असंही म्हटलं. आमच्या डोक्यात अक्कल असते आणि गुडघ्यात अक्कल असते असं खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना हातवारे करुन सांगितलं. “आम्ही काहीही करु शकतो,” असं खैरे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

तानाजी सावंतांवर टीका
आदित्य ठाकरे फक्त एक आमदार आहेत असं म्हणणारे पुण्यातील बंडखोर नेते तानाजी सावंत यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. “तानाजी म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही. मागे मागे फिरायचा तो आदित्य ठाकरेंच्या. आता ओळखत नाही असं म्हणतो. ही कोणती पद्धत आहे. तानाजी आदित्य ठाकरेंबद्दल बोलतो, उद्धव ठाकरेंबद्दल बोलतो. कशा करता बोलतो? तुम्ही काय मोठे शिक्षण सम्राट आहात म्हणून बोलता का? तुमची पण कोणत्या ना कोणत्या राज्यात ईडी होईलच सुरु,” असं तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करताना खैरे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

…तर शिवसैनिक सोडणार नाही
“मला हे आवडत नाही. तुम्ही आता गप्प बसावं आणि शिंदेंचं गुणगान गावं. इथं कशाला तुम्ही दोष देताय. फुटले ना तुम्ही आता तुमचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेनेबद्दल आता काही बोलायचं नाही,” असं खैरेंनी बंडखोर आमदारांना इशारा देताना म्हटलंय. “तुम्ही आमच्या नेत्यांच्या बाबतीत बोलू लागले तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”, असा इशारा खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला.

नक्की पाहा >> Photos: अजित पवारांच्या दौऱ्यावरुन शरद पवारांचा CM शिंदेंना टोला; म्हणाले, “सत्कारासाठी विरोधीपक्ष नेत्यांचे…, आपल्या राज्यकर्त्यांना…”

पुण्यात नेमकं घडलं काय?
सामंत कात्रज चौकातून कारने जात असताना शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि सामंत यांची कार अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गर्दीत एकाने सामंत यांच्या कारवर दगड फेकल्याने काच फुटली. सामंत यांच्या कारवर हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसैनिकांनी सामंत यांच्या कारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने सामंत यांच्या कारला वाट करुन दिली. या घटनेमुळे कात्रज चौकात तणावाचे वातावरण होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *