“…तर मी त्यांच्यासोबत उभी राहील”; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे गटातील आमदाराला सुप्रिया सुळेंची ऑफर | Supriya Sule Reacts on tanaji sawant mla says ncp supporters attacked my office not shivesena supporters scsg 91शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपलं कार्यालय फोडल्याचा आरोप करणारे शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सल्ला दिला आहे. शिवसैनिकांनी माझं कार्यालय फोडलं नव्हतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे भगवे गळ्यात घालून हे काम केलं होतं असा आरोप पुण्यातील कात्रज येथील शिवसेनेच्या या बंडखोर आमदाराने केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. इतकचं नाही तर सुप्रिया सुळे यांना जर तरच्या अटीवर तानाजी सावंत यांना या प्रकरणामध्ये ‘मी तुमच्याबाजूने उभी राहीन’ अशी ऑफरही दिली आहे.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

तानाजी सावंत काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना २५ जून रोजी बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड कार्यालयाच्या तोडफोडीसंदर्भात मोठं विधान केलं. “माझं कार्यालय फोडणारे जे कार्यकर्ते होते ते सेनेचे नव्हते. एखादा दुसरा असेल. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवं घालून कार्यालय फोडलं,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

“मी त्यावेळेसही गुवाहाटीमधून सांगितलं होतं की, सगळ्यांनी आपआपल्या औकादीत रहावं. आपण कोणाशी पंगा घेतोय हे डोक्यात ठेवावं आज आम्ही सत्तेत आहोत. सत्तेचा माज आम्ही डोक्यात चढू देणार नाही. ज्यांनी कोणी कार्यालयावर दगड पाडायचा, त्या माध्यमातून मोठं व्हायचा प्रयत्न केला असेल त्यांना भविष्यात त्यांची जागा कळेल,” असं सावंत म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत मग…”; शहाजीबापू पाटलांनी अगदी डोक्याला हात लावून आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख करत केलेल्या आरोपांवरुन प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळेंनी सावंत यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिलाय. “पोलिसांकडे जाऊन तक्रार करु शकतात. टीव्हीसमोर बोलण्याऐवजी पोलीस यंत्रणेकडे जावं. त्यातून कळेल. यंत्रणा त्यांच्याच हातात आहे ना? ते सरकारमध्ये आहेत ना?” असे उलट प्रश्न सुप्रिया यांनी विचारले. तसेच सुप्रिया यांनी, “माझी सगळ्यांना विनम्रपणे विनंती आहे की अजून तरी या देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे ते पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेऊ शकतात. त्यांचा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास नसेल तर मी त्यांच्यासोबत उभी राहील त्यांनी बिलकूल काळजी करु नये,” असंही टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> आता शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता; मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतरही नवी मुंबईत…

कधी झालेला हल्ला?
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी २१ जून रोजी बंड करुन नंतर २२ जूनला गुवाहाटी गाठल्यानंतर तानाजी सावंत हे सुद्धा शिंदे यांना समर्थन देत गुवाहाटीला पोहचले होते. गुवाहाटीमध्ये आमदार दाखल झाल्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी पुण्यातील बालाजीनगर येथील सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातल्याचं त्यावेळी सांगण्यात आलेलं. यावेळी या कार्यालयाच्या शटरपासून भिंतींवरही गद्दारासोबत असे शब्द लिहिण्यात आलेले.Source link

Leave a Reply