‘तंगडी कबाब हवी होती’,पण…,Ranbir Kapoor चं आलिया भट्टबद्दल मोठं विधान


मुंबई : अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंग दरम्यान रणबीर कपूर चित्रपटासह आपल्या नवीन वैवाहीक आयुष्याबद्दलचे अनेक किस्से सांगताना दिसत आहे. आलिया भट्ट बाबत असाचं एक किस्सा त्याने सांगितलाय, याची खुप चर्चा रंगलीय.

रणबीर कपूर शुक्रवारी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत वाणी कपूर आणि संजय दत्तही होते. पत्नी आलियाला ‘शमशेरा’चा टीझर आवडल्याचे रणबीरने यावेळी सांगितले. तसेच त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयीही त्याने सांगितले. 

आलियासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, मला डाळ भात नको, तंगडी कबाब हवेत असे मी नेहमीच म्हणत आलो आहे. पण माझ्या अनुभवावरून मी म्हणू शकतो की, ‘तंगडी कबाब’ नव्हे तर ‘दाल चावल’ सारखे काहीतरी साधे आणि आरामदायक हवे होते. डाळ भातापेक्षा चांगले दुसरे काहीही नाही. आलिया ‘दाल चावल’मधील तडकासारखी असल्याचे तो म्हणतोय. सोबत ती लोणचंही आहे, असे तो म्हणतो. 

आलियापेक्षा चांगला जोडीदार मला मिळूचं शकला नसता. आलिया माझ्यासाठी सर्वस्व आहे. दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

रणबीर पुढे म्हणाला की, ‘मला माहित नाही की ही चांगली गोष्ट आहे की वाईट. कारण माझे दोन चित्रपट ४५ दिवसात रिलीज होत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, हे माझ्यासाठी खूप मोठे वर्ष आहे कारण याचवर्षी माझेही लग्न झाले असल्याचे तो म्हणतोय.  

रणबीरने त्याच्या आगामी ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन्ही सिनेमांबद्दल सांगितले. त्यांचे एकापाठोपाठ एक दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘शमशेरा’ 22 जुलैला रिलीज होणार आहे, तर ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. Source link

Leave a Reply