तामिळनाडू – आठ करोड किंमतीची सी ककंबर जप्त

वृतसंस्था/दिल्ली – भारतीय तटरक्षक दल (आईसिजी) ने आज तामिळनाडूतील रामेश्वरम् जवळ दो हजार किलोग्रॅम प्रतिबंधित समुद्री मासा सी ककंबर आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करीसाठी घेउन जात असताना जप्त केला आहे. याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत आठ करोड रुपये आहे.

भारतीय तटरक्षक बलाचे उपमहानिरीक्षक आणि जनसंपर्क अधिकारी अनिकेत सिंह यांनी सांगीतले की फोर्सला सी ककंबर च्या तस्करीची माहिती मिळाली होती. यावर तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी मंनार खडी आणि पाक जलडमरु मध्य मध्ये टीम तैनात केली होती. सकाळी साडेसहा वाजता मंडपम पासून पंधरा किलोमीटर दक्षिण ला बेदलई जवळ एक नाव ज्यामध्ये 200 पोत्यात्यामध्ये भरलेली 2000 किलोग्राम ची सी ककंबर जप्त केली. यावेळी नावेमध्ये कोणी नव्हते.

श्री सिंह यांनी सांगितले की तटरक्षक दलाने नाव आणि माल घेऊन मंडपममध्ये आले व जे सर्व वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांनी सांगितले की लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग केला जाणाऱ्या या प्रतिबंधित समुद्री माशाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे आठ करोड रुपये किंमत आहे. हा मासा प्रामुख्याने मन्नार ची खाडी व पाक डमरूमध्य मध्ये आढळते. दक्षिण पूर्वी अशिया व चीनमध्ये याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

Leave a Reply