Headlines

पृथ्वीराज चव्हाणांवर बडोदा व अहमदाबादची निरीक्षकपदाची जबाबदारी |prithviraj chavan responsibility baroda and ahmedabad observer the gujarat assembly elections

कराड : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बडोदा व अहमदाबादचे निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्ष नेतृत्वाने जबाबदारी सोपवल्याची माहिती चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे पुढील चार दिवस अहमदाबाद दौऱ्यावर असणार आहेत. तेथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत तसेच त्यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा…

Read More

ऊसदराबाबत शेतकरी संघटनांची पायी दिंडी; यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला घातले साकडे

कराड : उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याची सुबुद्धी साखर कारखानदारांना द्यावी असे साकडे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर शेतकरी संघटनांच्यावतीने नतमस्तक होऊन घालण्यात आले.कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन उसदरासाठी निघालेली टाळ-मृदुंगाच्या गजरातील पायी दिंडी कराडच्या प्रीतिसंगमावर विसावली. येथील माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर उस आणि फुले वाहून शेतकरी व सामाजिक संघटनांच्या…

Read More

कराड : ऊसदर आंदोलन भडकण्याची चिन्हे | Dissatisfaction on sugarcane rate, possibility of more agitation in western maharashtra

कराड : गुजरात राज्यातील साखर कारखान्यांप्रमाणे न्याय ऊसदर मिळावा, ऊस वजनातील काटेमारी थांबवण्यात यावी, आधी ऊसदर जाहीर करावा आणि नंतरच गाळप हंगाम सुरू करावा आदी मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आक्रमक होवून एकजूट साधत असल्याने शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. करोना महासंसर्गाचा कालावधी लोटल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना राज्यकर्त्यांकडून अपेक्षित मदत मिळत…

Read More

जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर ई – बस, बायोटॉयलेट सुविधा सुरू

कराड : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ई – बस व बायोटॉयलेट सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीव्दारे लोकार्पण झाले. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेला कास…

Read More