BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…” | CM Eknath Shinde on Dasara Melava Video of people leaving ground when he was delivering a speech scsg 91

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना लोक उठून निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा व्हिडीओंवरुन विरोधकांनी खोचक शब्दांमध्ये टीका टीप्पणी सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या व्हायरल व्हिडीओंवर आणि भाषण सुरु असताना लोक निघून गेल्याच्या आरोपांवर उत्तर…

Read More

आवाज कुणाचा? शिवाजी पार्कात BKC पेक्षा अधिक ध्वनीप्रदूषण; किशोरी पेडणेकरांच्या भाषणाचा सर्वात मोठा आवाज तर CM शिंदेंचा आवाज… | noise Level report of dasara melava by cm eknath shinde bkc vs uddhav thackeray melava at shivaji park scsg 91

बुधवारी दादारमधील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्यात आल्याचं चित्र प्रमुख नेत्यांच्या भाषणात पहायला मिळालं. मात्र या दोन्ही मेळाव्यांपैकी कोणत्या दसरा मेळाव्यामध्ये ध्वनीप्रदूषण…

Read More

“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल | Dasara Melava Speech sandeep deshpande mns slams ex cm uddhav thackeray scsg 91

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. रझा अकदमीच्या मुद्द्यावर एक शब्दही न बोलणारे उद्धव ठाकरे हे हिंदूत्व सोडलं का विचारत असल्याचा टोला देशपांडेंनी लगावला. तसेच त्यांनी रेल्वे भरतीसाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचाही संदर्भ दिला….

Read More

devendra fadnavis mocks uddhav thackeray speech shivsena dasara melava 2022

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. अनेक राजकीय मुद्द्यांवरून एकमेकांवर टोलेबाजीही करण्यात आली. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी केलेल्या भाषणांमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना…

Read More

Dasara Melava: CM शिंदेंचं ‘ते’ एक वाक्य अमृता फडणवीसांना फारच आवडलं; कौतुकाचा वर्षाव करत म्हणाल्या, “आपल्या राज्याला जो…” | Dasara Melava Amruta fadnavis praises CM Eknath Shinde Tweets in support scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच शिंदे समर्थक आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. या मेळाव्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची झलक पहायला मिळाली. मात्र मेळाव्यातील भाषणापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या एका विधानावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…” | dasara melava 2022 MNS first comment on Uddhav Thackeray Rally at Shivaji Park scsg 91

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतचे मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या या…

Read More

Shivsena chief uddhav thackeray attacks rss chief mohan bhagwat dasara melava ssa 97

सरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ सप्टेंबर रोजी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासींची मशिदीत भेट घेतली. तसेच, त्यापूर्वी त्यांनी अन्य मुस्लिम नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला संबोधित करत होते. “मोहन भागवतांबद्दल मला आदर आहे. अलिकडच्या काळात मोहन…

Read More

uddhav thackeray dussehra melava speech slams bjp on hindutva

Uddhav Thackeray Speech Dasara Melava 2022 : शिवसेनेनं महाविकास आघाडीसमवेत सरकार स्थापन केल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून शिवसेनेनं हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा दावा सातत्याने भाजपाकडून केला गेला आहे. त्यात शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर भाजपाचीच री ओढत हिंदुत्वावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्कवर पार पडलेल्या…

Read More

uddhav thackeray slams bjp amit shah in dussehra melava 2022 speech shivsena

Dasara Melava 2022 Latest News : मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दोन दसरा मेळावे मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला पाहायला मिळाले. एकीकडे उद्धव ठाकरेंचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. उद्धव ठाकरेंनी मेळाव्यातील आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे, शिंदे गटातील बंडखोर यांच्यासोबतच भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही तोंडसुख घेतलं. यावेळी…

Read More

shivsena uddhav thackeray speech dussehra melava 2022 targets cm eknath shinde bkc

Dasara Melava 2022 Latest News : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याच्या राजकीय नाट्याचा उत्तरार्ध आज मुंबईत रंगताना पाहायला मिळाला. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमवीर या दोन्ही प्रमुख नेत्यांनी मेळाव्यातून एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून…

Read More