Headlines

आंदोलनातील गुन्हे माघारी घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – दि.१२ जानेवारी, सन २०१४ रोजी साखर कारखान्यांच्या विरोधात बार्शी तालुक्यातील खांडवी गावांमध्ये टेंभुर्णी-लातूर राज्यमार्गावर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन वैराग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी “चोर सोडून संन्याशाला फाशी” असा प्रकार करत आंदोलनातील शेतकऱ्यांवरच गुन्हे नोंद केले होते परंतु मागील सरकारच्या काळामध्ये शेतकरी…

Read More

आयटक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ०१ जानेवारी २०२२ पासून कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन

बार्शी / प्रतिनिधी – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी ग्रामविकास मंत्रालय आणि अर्थमंत्रालय एक दुसऱ्यावर जबाबदाऱ्या ढकलत आहेत. आंदोलनास मनाई करण्यात येते, मंत्री महोदयांची भेट होत नाही, चर्चा होत नाही. यातून ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक अरिष्टात ढकलला जात आहे म्हणून, ग्रामविकास मंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांचे लक्ष्य वेधण्यासाठी नाईलाजाने कोल्हापूर येथील बिंदूचौकात दि. ०१ जाने. २०२२…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातव्या दिवशीही संप सुरूच, सुटाने नोंदवला पाठिंबा

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी संपाचा सातवा दिवशीही संप चालूच राहिला. या संपला सुटाचे डॉक्टर लिंगायत व्ही पी, प्रा. मुळे एस एस, जेवळीकर ए ए आदींनी या संपास पाठिंबा नोंदवला. आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा चौथ्या दिवशीही संप सुरूच

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये बार्शी मधील झाडबुके महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज, एज्युकेशन कॉलेज, लॉ कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 18 डिसेंबर 2021रोजी पासून बेमुदत संपावर गेले आहेत. आज 21 डिसेंबर 2021 रोजी संपाचा चौथा दिवस आहे….

Read More

थेट विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पुणे -( दि.१६ ) / प्रतिनिधी – पुणे येथील माणिकचंद आयकॉन स्थित आयसीसिआय लोंबर्ड पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरू होताच दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, लागलीच त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी…

Read More

शेतकरी उतरले रस्त्यावर… मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित कार्यालयावर तीव्र आंदोलन -शंकर गायकवाड

बार्शी/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये, आज बार्शी-बीड रस्त्यावरील शिराळे पाटीवर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील व चालू वर्षी कमी मिळालेला पिकविमा, व्याजासहित ऊस बिले, वीज पुरवठा खंडित करणे, बार्शी सोलापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम, उजनीचे पाणी,…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रवास संपाकडे

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने झाडबुके महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे…

Read More

तीन काळे कृषी कायदे मागे बार्शीत घेण्यात आली विजयी सभा

बार्शी / प्रतिनिधी- अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS )वतीने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह कंपाऊंडमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे (comred tanaji thombare )यांच्या नेतृत्वाखाली 19 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता विजयीसभा घेण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. यावेळी नागरिकांना…

Read More

शेतकरी आंदोलनासमोर केंद्र सरकार नरमले , तिन्ही कृषि कायदे माघार घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केली घोषणा ‘तीनही कृषी कायदे मागे घेणार’

उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले होते.” नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi )यांनी आज प्रकाशपर्व निमित्त देशाला…

Read More

प्रभाकर देशमुख यांनी घेतली गूळपोळीतील आंदोलनकर्त्यांची भेट

बार्शी /प्रतिंनिधी – बार्शी (BARSHI)तालुक्यातील गुळपोळी येथे जनहित शेतकरी संघटनेचे(JANHIT SHETKARI SANGHTANA) शाखाध्यक्ष गुळपोळी विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बार्शी सहाय्यक निबंधक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागण्यासाठी शाखाध्यक्ष पायाने अपंग असणारे सूर्यकांत चिकणे (SURYAKANT CHIKANE )यांची गुळपोळी येथे विठ्ठलाच्या मंदिरात बेमुदत धरणे…

Read More