Headlines

तब्बल 3 वर्षानंतर ‘हा’ स्टार खेळाडू संघात पुनरागमन करणार

[ad_1]

मुंबई : आगामी T20 वर्ल्डकप 2022 साठी (T20 world Cup)  सध्या सर्वच संघ सज्ज झाले आहेत. या वर्ल्डकपसाठी प्रत्येक संघ त्यांचा ताकदवान संघ मैदानात उतरण्याची तयारीला लागलाय. काही संघानी या स्पर्धेसाठी नवख्या खेळाडूंना संधी दिलीय तर काहींनी अनेक वर्ष मैदानापासून दूर असलेल्या व सध्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. अशाच एका वादग्रस्त खेळाडूचं संघात पुनरागमन झालं आहे. हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात. 

टी20 वर्ल्डकप (T20 world Cup)  स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एका बलाढ्य टीमने त्यांच्या संघात एका वादग्रस्त खेळाडूला स्थान दिले आहे. काही कारणांमुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र आता त्याला वर्ल्डकपसाठी संघात स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, या खेळाडूला स्वत:ची संघात निवड झाल्याचेही आश्चर्य वाटत आहे. 

‘या’ कारणामुळे संघातू बाहेर
वर्ल्डकप 2019 च्या आधी हा खेळाडू ड्रग्ज चाचणीत अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. संघातून वगळल्यानंतर या खेळाडूने जगभरातील अनेक T20 लीगमध्ये भाग घेतला होता. या लीगमध्ये अक्षरश त्याने धावांचा पाऊस पाडला होता. पण तरीही संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. 33 वर्षीय या खेळाडूने 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

मुलाखतीत चुक मान्य
‘या’ खेळाडूने एका मुलाखतीत आपली चूक मान्य केली होती. 2019 च्या वर्ल्डकपपुर्वी त्याने ड्रग्ज घेतले होते. तो पुढे म्हणाला की, तो त्याच्या चुकांमधून शिकत आहे, असे त्याने म्हटले होते. 

‘हा’ आहे तो खेळाडू
ज्या खेळाडूबाबत आपण बोलत आहोत, तो खेळाडू अ‍ॅलेक्स हेल्स (Alex Hales) आहे. या खेळाडूची टी20 वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे जॉनी बेअरस्टोच्या जागी जेसन रॉयला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अचानक अ‍ॅलेक्स हेल्सला संधी दिली आहे. संघात निवड झाल्याचे पाहून अॅलेक्स हेल्सला देखील मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

अ‍ॅलेक्स (Alex Hales) टी-20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 world Cup) पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. आगामी वर्ल्डकपपुर्वी जोस बटलरसोबत डावाची सुरुवात करू शकतो. इंग्लंडचा हा फलंदाज पाकिस्तानात खेळण्यासाठी बेताब असेल, असे कर्णधार जोस बटलरने म्हटले आहे. बटलरने हेल्सचे वर्णन महान खेळाडू असे देखील केले आहे.

कारकीर्द 
हेल्सने (Alex Hales) 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1644 धावा केल्या आहेत. त्याने 8 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. अ‍ॅलेक्स T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला इंग्लिश फलंदाज आहे. त्याने इंग्लंडकडून 11 कसोटी आणि 70 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

दरम्यान तब्बल 3 वर्षानंतर अ‍ॅलेक्स हेल्स (Alex Hales) संघात पुनरागमन करत आहेत. त्यामुळे तो कशाप्रकारे आपला खेळ दाखवतो याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *