Headlines

T20 वर्ल्डकपच्या मेन स्क्वॉडमध्ये Mohammad Shami चा समावेश होण्याची शक्यता किती?

[ad_1]

मुंबई : टी-20 वर्ल्डसाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हाही अनेक प्रश्न उपस्थित झाले. आशिया कपमध्ये भारतीय गोलंदाजीची जी अवस्था झाली, त्यानंतर टी-20 वर्ल्डकपला टीमला लक्ष्य करण्यात आले. मोहम्मद शमीला याठिकाणी राखीव खेळाडू म्हणून घेतलं जातं, अनेक तज्ज्ञांनी त्याला टीममध्ये न घेण्यावर आक्षेप घेतला. मात्र आता याचं कारणही समोर आलंय.

T20 वर्ल्डकप टीमबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जर एखाद्या खेळाडूने गेल्या 10 महिन्यांपासून एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसेल, तर त्याला थेट T20 वर्ल्डकप टीममध्ये समाविष्ट करणं सोपं नाही.

निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पटेलने ब्रेकचा भरपूर वापर केला होता आणि तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, जर हर्षल किंवा जसप्रीत बुमराह यामध्ये नसते, तर मोहम्मद शमीचा टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये समावेश झाला असता.

कोणत्याही गोलंदाजाला किंवा खेळाडूला काही अडचण आल्यास 15 खेळाडूंच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर मोहम्मद शमीला टीममध्ये स्थान देण्यात येणारा पहिला खेळाडू असेल. टीम इंडियाने T20 वर्ल्डकपसाठी 15 खेळाडू आणि 4 राखीव खेळाडूंचा समावेश केला आहे.

मोहम्मद शमीबद्दल बोलायचं झालं तर त्याने शेवटचा टी-20 सामना टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्येच खेळला होता. तेव्हापासून त्याची टी-20 संघात निवड झालेली नाही. आशिया चषकातही त्याची निवड अपेक्षित होती पण तसं झाले नाही



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *