Headlines

T20 World Cup: टीम इंडिया फायनलमध्ये नाही, परंतु क्रिकेट मैदानावर आज 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

[ad_1]

T20 World Cup Final: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाच्या स्वप्नावर इंग्लंडने सेमी फायनलमध्ये पाणी फिरवले. असे असले तरी आज अंतिम सामन्यात भारतीय क्यूट मुलीचा जलवा पाहायला मिळणार आहे. मेलबर्नमध्ये एक गोंडस मुलगी नक्कीच पाहायला मिळेल. जानकी ईश्वर (Janaki Easwar) नावाच्या या 13 वर्षीय मुलीचे भारताशी नाते जोडले गेले आहे.

T20 च्या क्रिकेट महायुद्धातून भारत बाहेर पडला असला तरी मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर अवघ्या 13 वर्षांची भारतीय वंशाची मुलगी 90 हजार प्रेक्षकांसमोर ऑस्ट्रेलियन रॉक सादर करणार आहे. भारतीय वंशाची गायिका जानकी ईश्वर (Janaki Easwar) या सामन्यापूर्वी परफॉर्म करताना दिसणार आहे.

जानकीचे वडील अनुरुप दिवाकरण आणि आई दिव्या रवींद्र हे मुळचे केरळचे. 15 वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. जानकी ही त्यांची मुलगी. जानकीने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजिन रिऑलटी शो ‘दी व्हाईस ऑस्ट्रेलिया’ या कार्यक्रमात अगदी लहान वयातच आपल्या आवाजाची जादू जगाला दाखवली.

टी-20 वर्ल्डकपमध्ये आजची फायनल सुरु होण्यापूर्वी ओपनिंग सॉंग्स आणि म्युझिकल प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तिच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे. याबाबत जानकी म्हणाली, ‘एमसीजीमध्ये एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर आणि जागतिक स्तरावर लाखो प्रेक्षकांसमोर परफॉर्म करणे माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव असेल. माझे आई-वडील क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. त्यांच्यामुळेच हे घडू शकले. मी परफॉर्म करण्यास उत्सुक आहे. भारताने हा अंतिम सामना खेळला असता तर बरे झाले असते.

कोण आहे ही जानकी ?

जानकी ईश्वर करेंगी मेलबर्न में परफॉर्म

जानकीच्या आई-वडिलांचा जन्म केरळच्या एका गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सरकारी शाळांमध्येच झाले. 2007 मध्ये जानकीचे पालक ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आणि त्यानंतर दोन वर्षानंतर जानकीचा जन्म झाला. तिच्या आई-वडिलांना संगिताची आवड होती आणि लहानपणातच जानकी संगीत क्षेत्राकडे वळली. तिने लहान वयातच भरतनाट्यम नृत्य प्रकार शिकली. भारतीय कर्नाटक संगितापासून तिने संगिताचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ती तिच्या मैत्रिणी आणि वर्गातील मित्रांप्रमाणे इंग्रजी गाणे ऐकू आणि गाऊ लागली. तिथूनच तिच्या वेस्टर्न म्युझिकचा प्रवास सुरु झाला.

जानकीचा हट्ट पालकांनी पूर्ण केला आणि…

जानकीच्या पालकांची पार्श्वभूमी अंत्यत वेगळी होती. विषेशत: वेस्टर्न म्युझिकलबद्दल खोलवर माहिती नव्हती. मात्र, जानकीच्या  हट्ट अर्थात आग्रहानंतर तिला एका म्युझिकल क्लासला पाठवण्यात आले. मात्र, तरीही तिच्या पालकांचा वेस्टर्न म्युझिकलमध्ये रस नव्हता. अखेर जानकीचे म्युझिकल कोच डेव्हिड जेम्स यांनी तिच्या वडिलांना गांभिर्याने घेण्याचा सल्ला दिला. वडिलांनीही अखेर मनावर घेतले आणि इथेच तिच्या आयुष्याचा टर्निंग पाँईट ठरला.

जानकीची ‘ही’ खास बाब, महिला आणि पुरुष आवाजात…

जानकीचे कोच डेव्हिड जेम्स यांनी जानकीकडून खूप मेहनत करुन घेतली. जानकीच्या आवाजातील बदल जेम्स मास्तरच्या लक्षात आला आणि त्यांनी तिला मुलाच्या आवाजात गाणे गाण्याचा सल्ला दिला. आज जानकी दोन्हीही आवाजात गाणे गाते. हीच जानकी ऑस्ट्रेलियन तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलीय. आज हीच जानकी क्रिकेट मैदानावरील 90 हजार प्रेक्षक आणि टीव्हीसमोरील कोट्यवधी प्रेक्षकांसमोर गाणं सादर आहे. ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी नक्कीच अभिमानस्पद आहे. संगीत क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या भारतीय आणि ऑस्ट्रेलियन तरुण-तरुणींसाठी जानकी एक आदर्श ठरत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *