Headlines

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा होताच ‘या’ प्रसिद्ध खेळाडूने घेतला सन्यास

[ad_1]

मुंबई : टी20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक य़ुवा खेळाडूंना सधी देण्यात आली नाही. शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन या सारख्या युवा प्रतिभावंत खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. याच संतापात आता एका प्रसिद्ध खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.  

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup)  भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या स्पर्धेसाठी परतले आहेत. तर अनेक खेळाडूंना डच्चू मिळालाय. त्यात एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे याने निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.  

पोस्टमध्ये काय? 
इन्स्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना ईश्वर पांडेने (Ishwar Pandey) लिहिले की, आज तो दिवस आला आहे आणि जड अंत:करणाने मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे तो म्हणतोय. तो पुढे लिहतो की,  2007 मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला असल्याचे त्याने सांगितले. 

पांडे (Ishwar Pandey) पुढे लिहतो की,  इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत माझा समावेश करण्यात आला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचेही दु:ख असल्याची खंत शेवटी त्यांनी व्यक्त केली. 

आयपीएलमध्ये ‘या’ संघातून खेळायचा?
ईश्वर पांडे (Ishwar Pandey) आयपीएलमधील महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग आहे. मात्र, गेल्या 3 हंगामात त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. 

कारकिर्द
वेगवान गोलंदाजाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने 75 प्रथम श्रेणी सामन्यांव्यतिरिक्त 58 लिस्ट ए आणि 71 टी-20 सामने खेळले आहेत. 75 प्रथम श्रेणी सामन्यांव्यतिरिक्त, ईश्वर पांडेने 58 लिस्ट ए आणि 71 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 263, 63 आणि 68 विकेट्स घेतल्या आहेत. 

या खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी 2014 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करत असताना त्या दौऱ्यावर ईश्वर पांडे (Ishwar Pandey Retirement) भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग होता.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *