Headlines

T20 World Cup : क्वालिफायच गणित सुटलं! भारताच्या ग्रुपमध्ये ‘या’ दोन संघाची एन्ट्री

[ad_1]

पर्थ : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) क्वालिफाय सामने पार पडले आहेत. या क्वालिफाय सामन्यातून आता 4 संघ पुढे आले आहेत. या 4 संघामधून दोन संघ गट 1 आणि उरलेले दोन संघ गट 2 मध्ये विभागले जाणार आहेत. यानंतर सुपर12 च्या सामन्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान हे 4 संघ कोणते आहेत? व टीम इंडियाच्या (Team India) ग्रुपमध्ये सामील झालेल्या त्या दोन संघाती नावे काय आहेत, ते जाणून घेऊयात. 

स्कॉटलंडचा पराभव करत सुपर12 मध्ये दाखल

स्कॉटलंडने (Scotland) प्रथम फलंदाजी करता 6 विकेट गमावून 132 धावा केल्या. जॉर्ज मुनसेने सर्वाधिक 54 आणि कॅलम मॅक्लिओडने 25 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून (zimbabwe) तेंडाई चतारा आणि नागरवा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या झिम्बाब्वेने 18.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 133 धावा करून सामना जिंकला. क्रेग इर्विन 58 आणि सिकंदर रझा यांनी 40 धावांची मॅचविनिंग खेळी करत हा विजय मिळवला. या विजयासह झिम्बाब्वे सुपर 12 मध्ये दाखल झाले. 

‘हे’ आहेत चार संघ

T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 मध्ये सहभागी होणारे सर्व संघ निश्चित झाले आहेत. सुपर-12 मध्ये पोहोचणारा झिम्बाब्वे हा शेवटचा संघ होता. क्रेग इर्विनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने (zimbabwe) होबार्ट येथे झालेल्या सामन्यात स्कॉटलंडचा (Scotland) पाच गडी राखून पराभव करून सुपर-12 मध्ये प्रवेश केला. झिम्बाब्वेपूर्वी श्रीलंका, नेदरलँड आणि आयर्लंडनेही क्वालिफाय सामना जिंकून सुपर-12 साठी पात्रता मिळवली होती. 

टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये ‘हे’ दोन संघ

सुपर-12 मध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांपैकी झिम्बाब्वे (zimbabwe) आणि नेदरलँड (Netherland) या संघांना भारताच्या गटात प्रवेश मिळाला आहे. तर श्रीलंका आणि स्कॉटलंडला गट 1 मध्ये स्थान मिळाले आहे.

टीम इंडियाशी होणार सामना 

झिम्बाब्वे (zimbabwe) ब गटात क्वालिफाय सामन्यात प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे त्याला भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश या संघांचा समावेश असलेल्या सुपर-12 टप्प्यातील गट-2 मध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणारा भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा सामना निश्चित करण्यात आला आहे. आणि भारताचा नेदरलँड विरुद्ध 27 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

सुपर-12

गट 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ विजेता (श्रीलंका), गट ब उपविजेता (स्कॉटलंड)
गट 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, गट अ उपविजेता (नेदरलँड), गट ब विजेता (झिम्बाब्वे)

तीन टप्प्यात वर्ल्ड कप खेळवला जाणार 

T20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) एकूण तीन टप्प्यात खेळवला जात आहे, ज्यामध्ये फेरी 1, सुपर-12 आणि प्लेऑफ सामने समाविष्ट आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या 16 पैकी 8 संघ थेट गट-12 साठी पात्र ठरले आहेत, तर उर्वरित 4 संघ श्रीलंका, स्कॉटलंड, नेदरलँड आणि झिम्बाब्वे हे पात्रता फेरी जिंकून सुपर-12 साठी पात्र ठरले आहेत.

‘या’ दिवशी भारताचे सामने

  • 23 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न
  • 27 ऑक्टोबर विरुद्ध नेदरलँड्स, सिडनी दुपारी 12.30 वाजता
  • 30 ऑक्टोबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 4.30, पर्थ
  • 2 नोव्हेंबर विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1.30 वाजता, अॅडलेड
  • 6 नोव्हेंबर विरुद्ध झिम्बाब्वे, दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न

दरम्यान सुपर 12 निश्चित झाल्यानंतर आता या संघाच्या सामन्याची उत्सुकता क्रिकेट फॅन्सना लागली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *