Headlines

T20 World Cup मधील खूप कमी लोकांना माहित असलेले रेकॉर्ड

[ad_1]

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेची सुरुवात झालीये. भारताला आपला पहिला सामना पाकिस्तानच्या विरुद्ध खेळायचा आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना रंगणार आहे. पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारताने जिंकला होता. आतापर्यंत एकूण 7 सीजनमध्ये वेस्टइंडीजने 2 वेळा तर भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने 1-1 वेळा ही टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.

T20 World Cup मधील रेकॉर्ड

1. महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर विकेटकीपर म्हणून सर्वाधिक 32 फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

2. वेस्टइंडिज (West Indies) टीमने सर्वाधिक 2 वेळा (2012 आणि 2016) टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.

3. एबी डिव्हिलियर्सच्या (AB de Villiers) नावावर सर्वाधिक 23 कॅच पकडण्याचा रेकॉर्ड आहे.

4. टी20 वर्ल्ड कप मध्ये 2 शतके ठोकण्याचा रेकॉर्ड फक्त ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे. त्याने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध तर 2016 मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध हा कारनामा केलाय.

5. स्पिनर रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) भारतासाठी सर्वाधिक 26 विकेट घेतल्या आहेत.

6. आयोजक देश म्हणून कोणत्याच देशाने टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही.

7. ऑस्ट्रेलियाला (Australia) 2007 मध्ये पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने 5 विकेटने पराभूत केले होते.

8. श्रीलंकेच्या (Sri lanka) नावावर सर्वाधिक स्कोरचा रेकॉर्ड आहे. केनियाच्या विरुद्ध 2007 मध्ये त्याने 6 विकेटच्या मोबदल्यात 260 रन केले होते.

9. माहेला जयवर्धनेने (mahela jayawardene) टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 1016 रन बनवले आहेत.

10. टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्रिक ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) 2007 मध्ये बांग्लादेशच्या विरुद्ध घेतली होती.

11. बांग्लादेशच्या शाकिब अल हसन (Shakib al hasan) ने टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 41 विकेट घेतले आहेत.

12. टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी स्कोर नेदरलँडचा (netherlands) आहे. ज्यांनी 2014 मध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध फक्त 39 रन केले होते.

13. टी20 वर्ल्ड कपमध्ये एकमात्र बॉल आउट भारत आणि पाकिस्तान (bowl out india vs Pakistan) यांच्यात 2007 मध्ये झाला आहे. त्यानंतर सुपरओव्हरची प्रथा आली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *