T20 World Cup – भारत-पाकिस्तान आमने-सामने , 24 ऑक्टोबरला होणार सामना

आयपीएल 2021 नुकतंच संपले आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये चेन्नई सुपर किंग विजय प्राप्त केला आहे. आता T20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला आहे.

24 ऑक्टोंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युएई मध्ये सामना होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ आधीपासूनच यूएई मध्ये उपस्थित आहे. या स्पर्धेची सुरुवात सराव सामन्यापासून होईल.

T20 या विश्वचषक स्पर्धेचे सुरुवात 17 ऑक्टोंबर पासून झालेली असून या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येईल.

सराव सामन्यामध्ये भारताचा 18 ऑक्टोंबर रोजी इंग्लंड व 20 ऑक्टोंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरोधात सराव सामना खेळला जाईल.

24 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply