Headlines

T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया (india vs australia t20) विरूद्ध टी20 मालिका खेळतेय. या मालिकेनंतर साऊथ आफ्रिकेसोबत टीम इंडिया तीन सामन्यांची टी20 मालिका आणि वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर थेट टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) खेळणार आहे. या वर्ल्डकपआधीच रविंद्र जडेजा (ravindra jadeja) दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यानंतर आणखीण एक धक्का टीम इंडियाला बसला आहे. त्यामुळे भारतीय टीमचं टेन्शन वाढलं आहे. 

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (ravindra jadeja) आधीच दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो टी20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. हा धक्का टीम इंडिया सोसत असताना आता आणखीण एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा खेळाडू दीपक हुडा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तोही मुकणार असल्याचे बोलले जात आहे.

बीसीसीआय काय म्हणाले?  
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपक हुडा (Deepak Hooda) रविवारी तिसऱ्या टी-20 सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता, त्यामुळे तो प्लेइंग-11 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाल्याची माहीती बोर्डाने दिली आहे. दीपक हुड्डा देखील भारताच्या T20 विश्वचषक संघाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत ही दुखापत खूप गंभीर असेल तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. 

दुखापतीचं ग्रहण
टी20 वर्ल्डकपला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेला असताना टीम इंडिया दुखापतीने हैराण झाली आहे. पहिला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) गुडघ्याच्या दुखापतीमुळे मायदेशातील मालिका आणि T20 विश्वचषकातून बाहेर पडला. त्यानंतर मोहम्मद शमीला कोरोना झाला, त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया मालिकेत भाग घेऊ शकला नाही. टी-20 वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूमध्ये मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे.

T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *