T20 World Cup आधी जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत, ‘या’ तीन खेळाडूंना मिळणार संधी


तिरुवनंतपुरम : टीम इंडिया (Team India)  सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 (ind vs sa t20i) मालिका खेळतेय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर झाला होता. पाठदुखीच्या त्रासामुळे बुमराहला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र टी20 वर्ल्डकपच्या तोंडावर बुमराहची ही दुखापत खुपच गंभीर आहे. या दुखापतीमुळे तो टी20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) बाहेर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान जर तो टी20 वर्ल्डकपमधून बाहेर झाला तर  ‘या’ तीन गोलंदाजांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. हे तीन खेळाडू कोण आहे, ते जाणून घेऊयात. 

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah)  दुखापत टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup दृष्टीकोनातून खुपच गंभीर आहे. त्यामुळे तो टी20 वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला त्या 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये बुमराहची जागा घेऊ शकतात.

मोहम्मद शमी
टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah)  जागा घेणाऱ्या यादीत पहिले नाव मोहम्मद शमीचे (Mohmmad shami) येते. बुमराहच्या जागी शमीचा संघात समावेश केला जाऊ शकतो. हा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग होता, पण कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला होता. आता त्याची चाचणी निगेटीव्ह आल्याचीही माहिती असुन तो तंदरूस्त आहे. 

दरम्यान शमी गेल्या वर्ल्डकपमध्येही टीम इंडियाचा भाग होता. परंतु यावेळी त्याला स्टँड बाय प्लेअरच्या यादीत ठेवण्यात आले आहे. T20 वर्ल्डकप 2021 मध्ये त्याने एकूण 6 सामन्यात गोलंदाजी केली आणि 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, जर तुम्ही त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 17 T20I सामने खेळले आहेत आणि 9.54 च्या इकॉनॉमीसह 18 विकेट्स घेतल्या आहेत.

दीपक चहर
या यादीत दुसरे नाव दीपक चहरचे (Deepak chahar) आहे, ज्याला जसप्रीत बुमराहच्या जागी टी-20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळू शकते. वर्ल्डकपच्या स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत दीपकच्या नावाचाही समावेश असून, संघात बदल करण्यासाठी भारताकडे अजूनही वेळ आहे.

हा वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे आणि चांगली गोलंदाजी करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 24 रन्स देत 2 विकेट घेतले. त्याचवेळी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 5 विकेट घेत त्याने दमदार पुनरागमन केले. यासोबतच दीपकने (Deepak chahar) यावर्षी वनडेमध्ये 9 आणि टी-20मध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद सिराज
या यादीत तिसरे नाव मोहम्मद सिराजचे (Mohmmed siraj) आहे, ज्याला जसप्रीत बुमराहच्या जागी टी-20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळू शकते.सिराजचा T20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. पण बुमराहची दुखापत गंभीर झाल्यास सिराजला ऑस्ट्रेलियन भूमीवर शानदार गोलंदाजी केल्यामुळे त्याला संधी दिली जाऊ शकते. सिराजने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 13 विकेट घेतले आहेत. त्याचबरोबर या वर्षी सिराजने एकूण 12 सामने खेळले असून 18 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (ind vs sa t20i)पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला होता. या विजयासह टीम इंडियाने (Team India) मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाचे लक्ष मालिका खिशात घालण्यावर आहे. Source link

Leave a Reply