Headlines

T 20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार, पंत खेळणार का?

[ad_1]

मुंबई : बीसीसाआयने (Bcci) सोमवारी आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2022) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. तर 3 राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि दीपक चाहरचा (Deepak Chahar) समावेश आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी न मिळाल्याने संजू समर्थकांचा हिरमोड झालाय. दुसऱ्या बाजूला इशान किशनलाही (Ishan Kishan) वगळण्यात आलंय. मात्र संघ जाहीर झाल्यानंतर एकच प्रश्न सातत्याने उपस्थित  होतोय, तो म्हणजे टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह खेळणार? (icc t20i world cup 2022 indian cricket team playing eleven rohit sharma deepak hudda rishabh pant or dinesh karthik)

टीम इंडियाची कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळे आशिया कप पाठोपाठ टी 20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं. त्यामुळे स्थिरस्थावर झालेला भारतीय संघाला मोठा झटका लागला. त्यामुळे टीम इंडियाला आता पुन्हा बॅलन्स करायला मेहनत घ्यावी लागणार आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकाकडून अनेक चुका झाल्या. परिणामी टीम इंडियाला 5 गोलंदाजांसह मैदानात उतरावं लागलं. ज्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता टीम इंडियासमोर तगडी आणि तितक्याच मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरण्याचं आव्हान असणार आहे. 

या सर्व चर्चेदरम्यान टीम इंडियाचा आजी माजी खेळाडूंनी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इएसपीएन क्रिकइंफोवर चेतेश्वर पुजारा, रॉबिन उथप्पाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. उथप्पाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पंतला संधी दिलेली नाही.

रॉबिन उथप्पाची प्लेइंग इलेव्हन-  केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल.

चेतेश्वर पुजाराची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंडया, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.

त्यामुळे आता कॅप्टन रोहित कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत वर्ल्ड कपमोहिमेसाठी मैदानात उतरणार,याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *