Headlines

स्वत: उद्धव ठाकरे सूरतला गेले असते तर? उद्धव ठाकरे बंडखोरांसंदर्भातील प्रश्नावर म्हणाले, “माझ्या मनात…” | uddhav Thackeray Interview With Sanjay Raut Part 2 ex cm on going to surat after revelation of revolt by shinde group scsg 91

[ad_1]

महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी सूरत गाठले आणि राज्यातील नाट्यमय घाडमोडींनंतर नऊच दिवसात ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजपाचा पाठिंबा घेऊन शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या बंडखोरीची माहिती सर्वात आधी समोर आली तेव्हा शिंदेंची समजून घालण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे दोन नेते सूरतला गेले होते. मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. त्यानंतरच्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीतून सरकार स्थापन झाल्यावर अगदी आदित्य ठाकरेंना पाठवण्याची तयारी दर्शवण्यात आली होती असा दावाही बंडखोरांपैकी काहींनी केला. मात्र आता त्यावेळेस थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच सूरतला गेले असते तर चित्र वेगळं असतं असा दावा करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनीच उत्तर दिलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की पाहा >> Photos: आता बाळासाहेबांवरुन शिवसेना विरुद्ध मनसे? सूचक विधान करत म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या…”

रहस्यामध्येच उत्तर आहे
“हे आमदार आधी सूरतला गेले, मग गुवाहाटीला गेले मग गोव्याला आले असं त्यांनी एक पर्यटन केलं. पण सुरुवातीला सगळे आमदार अगदी व्यवस्थित सूरतला गेले. म्हणजे अत्यंत सुरक्षित जागी…” असं राऊत यांनी मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारताना म्हटलं. त्यावर राऊत यांचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच उद्धव यांनी, “सूरतला का गेले? कर्नाटकात का नाही गेले? मध्य प्रदेशात का नाही गेले? पहिले गोव्या का नाही गेले? राजस्थानला का नाही गेले.
पहिले गुजरातेतच का गेले?” असे प्रश्न उपस्थित केले. तसेच राऊत यांनी, “गुवाहाटीला जाताना व्हाया सूरत गेले. हे एक रहस्य आहे,” असं म्हटलं असताना उद्धव ठाकरेंनी, “रहस्यामध्येच उत्तर आहे ना,” असा टोला.

नक्की वाचा >> …तर एकनाथ शिंदे भाजपाकडे पंतप्रधान पद मागतील; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

ठाकरे सूरतला गेले असते तर…
“स्वत: उद्धव ठाकरे उठून सूरतला गेले असते तर चित्र बदललं असतं का?” असा थेट प्रश्न राऊत यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी, “कशासाठी? माझ्या मनात काही पाप नव्हतं. माझ्याकडे येऊन बसा, बोला सांगत होतो,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”

अगदी काहीही नसताना ईडी का मागे लावली?
“मला सांगण्यात आलं की काही आमदारांचा असा दबाव आहे की भाजपासोबत जायचंय. मी म्हटलं अशा सगळ्या आमदारांना आणा. माझ्याकडे त्यांच्यासाठी दोन ते तीन प्रश्न आहेत. एक म्हणजे कारण नसताना शिवसैनिकांना ईडी-पीडी आहे. अगदी काहीही नसताना का ईडी मागे लावली आहे? म्हणजे त्यावेळेस हिंदुत्वासाठी अगदी दंगलीत लढलेले शिवसैनिक मग तो अनिल परब असेल, तुम्ही त्या वेळेस हिंदुत्वाची बाजू लावून ठरलेली. यांना एकदम तुम्ही आता छळायला लागलात. हा छळ कुठपर्यंत चालणार? असा यांचा काय मोठा गुन्हा आहे?” असे प्रश्न उद्धव यांनी भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आमदारांना त्यावेळी विचारायचे होते असं म्हटलं.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

तुमच्या नेत्यांच्या कुटुंबियांबद्दल, घराबद्दल, मातोश्रीबद्दल बोलून सुद्धा तुम्ही शेपट्या घालून जाणार?
“दुसरी गोष्ट जे त्या वेळेला नाकारलं (अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद) त्याबद्दल यावेळेस भाजपा काय करणार? शिवसेनेला सन्मानाची वागणूक भाजपा कशी देणार? तिसरी गोष्ट मला आमदारांना विचारायची आहे. मी त्या दिवशी खासदारांनाही बोललो की अडीच वर्ष कोणी हिंमत केली नाही. बाळासाहेबांच्या कुटुंबियाबद्दल, मातोश्रीबद्दल अश्लाघ्य भाषेत जे बोललं गेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? त्याबद्दल तुम्ही मधल्या काळात का बोलला नाहीत की आम्हाला मान्य नाही. एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या कुटुंबियांबद्दल, घराबद्दल, मातोश्रीबद्दल बोलून सुद्धा तुम्ही शेपट्या घालून जाणार?” असे सवाल आपल्याला भाजपासोबत जाण्याचा विचारात असणाऱ्या आमदारांना त्यावेळी करायचे होते असं उद्धव म्हणाले.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

भुजबळांना बाळासाहेबांनी माफ केलं
“जसं भुजबळांबद्दल बोललं जातं त्यांनी अटकेचा प्रयत्न केला. पण त्यांनी नंतर व्यवस्थित खुलासा केला. त्यानंतर स्वत: भुजबळ आणि शिवसेनाप्रमुखांची भेट मातोश्रीत झाली. तो सगळा जो काही संवाद होता त्याला मी पण साक्षीदार होतो. तुम्ही पण होता मला वाटतं. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं की यापुढे आपलं वैर संपलं,” असंही उद्धव म्हणाले. त्यावर राऊत यांनी, “बाळासाहेब हे उमद्या स्वभावाचे होते. त्यांनी अनेकदा शत्रूलाही माफ केलं,” अशी प्रतिक्रिया दिली.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

त्या पत्राचं होर्डींग करुन लावा…
“हे जे काय यांनी (बंडखोरांनी) केलेलं आहे यांच्याकडून नेमकं काय होणार आहे? हे सगळं बदनामी सहन करुन वगैरे केवळ तुमचा आग्रह आहे म्हणून मी शिवसेनेला त्यांच्या दाराशी नेऊन बांधू का?” असा प्रश्न उद्धव यांनी बंडखोरांना विचारला. “तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता पण शिवसेनेला सन्मान देण्याचं आज त्यांनी जे केलं ते आधी का नाही केलं? ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष होऊन गेली होती. एकतर त्यांचा मुख्यमंत्री झाला असता किंवा शिवसेनेचे झाला असता. मी हे सुद्धा सांगितलेलं की जर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पहिली अडीच वर्ष दिली तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचाय.
ती तारीख वार टाकून खाली त्या मुख्यमंत्र्यांची सही आणि खाली पक्षप्रमुख म्हणून माझी सही. असं पत्राचं होर्डिंग करुन मंत्रालयाच्या दारात लावा,” असंही उद्धव म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *