Headlines

स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचे संकेत काय? पाणी पाहिल्यावर काय होतं?

[ad_1]

मुंबई : झोपल्यावर अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहत असतात. ही स्वप्न कधी स्मरणात राहतात तर कधी आपण ती विसरतो. पण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांमधून काही संकेत मिळत असतात का? स्वप्नात जे दिसत त्यामागचं सत्य काय? (Dream Interpretation) यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. (Dream Indicate Progress in Your Life like Job and Business ) स्वप्न शास्त्रानुसार, अनेक स्वप्न हे तुम्हाला शुभ तर काही स्वप्न तुम्हाला अशुभ संकेत देत असतात. स्वप्नात पाणी दिसणं हे शुभ संकेत असतात. पाहूया अशाच काही स्वप्नांचा अर्थ….. 

स्वप्नात पाऊस पाहणे 

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात पाऊस पडताना पाहणे हे शुभ संकेत मानले जातात. हे स्वप्न तुम्हाला करिअरमध्ये शुभ संकेत, यश प्राप्त करून देतात. तसेच या स्वप्नाचा संकेत असतो, भविष्यात घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे. 

स्वप्नात नदी पाहणे 

स्वप्नशास्त्रानुसार, जर कुणी वाहती नदी स्वप्नात पाहिली तर त्याला शुभ गोष्ट प्राप्त होणार आहे. तसेच स्वप्नात स्वतःला पोहताना पाहणे हे देखील शुभ संकेत आहेत. अशी स्वप्न भविष्यात सगळी मनोकामना पूर्ण करतात. 

स्वप्नात पुराचे पाणी पाहणे 

पुरं हा माणसाला उद्धवस्त करतो. मात्र पुराचे पाणी स्वप्नात पाहणे हे शुभ संकेत मानले जातात. स्वप्न शास्त्रानुसार, याचा अर्थ लवकरच शुभ बातमी, गोड बातमी हाती कानी येणार आहे. तसेच स्वप्नात घाणेरडं पाणी देखील पाहणं शुभ मानलं जातं. 

स्वप्नात विहिरीतील पाणी पाहणं 

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात विहिरीचं पाणी पाहणं शुभ समजलं जातं. यामुळे अचानक धनप्राप्तीचे संकेत दिले जातात. तसेच स्वप्नात स्वच्छ पाणी देखील पाहणे शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *