सुष्मिता सेनने इकडे बॉयफ्रेंडला सोडलं, आता तिचा भाऊ ही पत्नीपासून दूर?


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, काही दिवसांपूर्वी तिने बॉयफ्रेंडपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती.

आता पुन्हा एकदा ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सुष्मिता प्रमाणे तिच्या भावाने ही पत्नीपासून दूर राहण्याचं ठरवलं आहे असं बोललं जात आहे. 

सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपा आणि भाऊ राजीव सेन आता आई-वडील झाले आहेत. चारूने काही महिन्यांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. आता मुलीच्या जन्मानंतर चारू आणि राजीव यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सुष्मिता सेनचा भाऊ आणि मेहुणीच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या वृत्तांबद्दल चारू आणि राजीव यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही आणि चारू याविषयी बोलू इच्छित नाही.

एका संवादामध्ये चारू हिला याबाबत विचारले असता, अभिनेत्री म्हणाली, ‘मला आता याविषयी बोलायचे नाही’.

आजकाल चारू आणि राजीव सोशल मीडियावर एकत्र कोणतेही फोटो पोस्ट करत नाहीत. अलीकडे चारूच्या वाढदिवसानिमित्तही राजीवने तिच्यासाठी कोणतीही पोस्ट लिहिली नाही. सध्या दोघेही एकत्र राहत नाहीत. चारू गेल्या काही दिवसांपासून सतत प्रवास करत होती.

तिने तिची चार महिन्यांची चिमुरकली जियाना हिलाही सोबत नेले. आजकाल चारू बिकानेरला तिच्या माहेरच्या घरी राहत होती. जिथे तिने आपला वाढदिवस साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पण यावेळी तिचा पती तिथे नव्हता.

Brother's video after Sushmita Sen's breakup, was there any third person in  the relationship? - sushmita sen brother rajeev relationship video after  actress announced breakup tmov - Wings Daily News

एवढेच नाही तर राजीव आणि चारू सोशल मीडियावर एकमेकांना फॉलोही करत नाहीत. अलीकडेच राजीवने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीला सतत प्रवास करायला लावल्याबद्दल चारूला सुनावले आहे.

राजीवने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मुलगी जियानासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यात लिहिले होते, “जियाना वडिलांसोबत घरी परत ये, जास्त प्रवास करणे तुझ्यासाठी सुरक्षित नाही. खूप दिवसांपासून तुला पाहिले नाही, लवकर ये आणि माझ्यासोबत खेळ.”Source link

Leave a Reply