Headlines

सुष्मिता सेनच्या वहिनीनं पहिलं लग्न लपवलं? आता मागतेय पतीकडून घटस्फोट 

[ad_1]

मुंबई : सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांच्यातील मतभेदाच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. याआधीही या कपलच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. आतापर्यंत दोघांनीही या प्रकरणी मीडियाला काहीही सांगितलेलं नाही. नेहमीप्रमाणे सगळंकाही ठीक होईल अशी चाहत्यांना आशा होती पण परिस्थिती आणखीन बिघडत चालली आहे.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारू असोपा म्हणाली की, तिने राजीवला खूप संधी दिल्या आहेत. पण आता तिला घटस्फोट हवा आहे. हे परस्पर संमतीने व्हावं अशी तिची इच्छा असताना, दुसरीकडे राजीव सेन म्हणाला की, चारूने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल तिच्यापासून लपवून ठेवलं.

चारू असोपा आणि राजीव सेन यांच्यातील भांडणाची बातमी त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनीच आली होती. दोघांमध्ये अनेक ब्रेकअप-पॅचअप झाले. त्यांना एक लहान मुलगी आहे. ज्यानंतर लोकांना वाटलं की सगळं काही ठीक होईल. आता दिलेल्या एका मुलाखतीत चारू म्हणाली, ”लग्नाचं आता काहीच वाटत नाही. लग्न झाल्यापासून गेली तीन वर्षे आमच्या वैवाहिक जीवनात अडचणीच सुरु आहेत.  हे सर्वांनाच माहीत आहे. पण मी संधी दिली. पूर्वी या अडचणी फक्त माझ्यासाठी होत्या पण आता या अडचणी आमच्या मुलीसाठीही झाल्या आहेत. त्याला संधी देऊन तीन वर्षे निघून गेल्यावर मला काहीच कळलं नाही.

चारूने पुढे सांगितलं की, त्याच्यात विश्वासाची कमतरता आहे आणि आता मी ते सहन करू शकत नाही. मी त्याला एक नोटीसही पाठवली आहे की, आपण परस्पर संमतीने वेगळं व्हावं, कारण आपल्या नात्यात काहीही शिल्लक नाही. मला वेगळं व्हायचं आहे कारण माझी मुलगी या वातावरणात वाढू इच्छित नाही. लोकं आपल्याला शिव्या देत आहेत हे तिने बघावं असं मला वाटत नाही.  

तर दुसरीकडे राजीव म्हणाला, चारूच्या पहिल्या लग्नाबद्दल कोणालाच माहिती नव्हती.  तिच्या मूळ गावी बिकानेरशिवाय कोणालाही ही माहिती नव्हती. ही एक गुप्त पळवाट होती जी त्या सर्वांनी लपवून ठेवली होती. त्यामुळे मला धक्का बसला. लग्नाला तीन वर्षे झाली आणि मला हे कळलंही नाही. मला वाटतं तो तिचा भूतकाळ होता.

पण तिने निदान मला एकदा तरी सांगायला हवं होतं. कारण मी हे आदराने स्वीकारलं असतं. आजच्या जगात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणाच ठरेल असंही राजीव म्हणाला. जग बदलत आहे आणि तिला फक्त पैशाची भाषा कळते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *