Sushmita Sen : रिलेशनशिपच्या घोषणेनंतर सुष्मिता सेन भारतात परतली म्हणाली, ‘मला नेहमीच माहित होतं’…


मुंबई : मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा भाग आहे. नुकतीच ललित मोदींसोबतचं नातं तिने जाहीर केल्यानंतर ती चर्चेचा विषय बनली होती. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री ट्रोलिंगची शिकारही झाली आहे. तर अनेकांनी तिला पाठिंबाही दिला. दरम्यान, अभिनेत्री मोठ्या सुट्टीनंतर मायदेशी परतल्याची बातमी येत आहे.

अभिनेत्री नुकतीच तिच्या मोठ्या सुट्टीवरून घरी परतली आहे. घरी आल्यानंतर, तिला चाहत्यांनी पाठवलेल्या अनेक भेटवस्तू आणि नोट्स मिळाल्या, ज्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये, तिने तिच्या चाहत्याने पाठवलेली एक नोट शेअर केली आहे. ज्या नोटमध्ये लिहिलं आहे की, ‘प्रिय सुष्मिता मॅडम, जेव्हा मला काय करावं हे माहित नसतं. आणि मला हसायचं असतं,  तेव्हा मी माझे डोळे बंद करते आणि तुझ्याबद्दल विचार करते आणि माझ्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते. मला सांगायचं आहे की, मी अजूनही तुझ्याबद्दल विचार करते. तू माझं जग आहेस.’

तिच्या फॅनची ही नोट शेअर करताना सुष्मिताने लिहिलं की, ‘मी जवळपास महिनाभर प्रवास करून घरी परतले आहे. घरी आल्यावर मला जगभरातील हितचिंतकांकडून भेटवस्तू आणि नोट्स मिळाल्या आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, मी तुमचं प्रेम अनुभवत आहे. आणि हे तुमचं हे प्रेम पाहून मला सतत वाटतय की, चांगुलपणा अजूनही अस्तित्त्वात आहे. हे मला नेहमीच माहित होतं. तुम्ही सर्वांनी या सत्याची पुष्टी केली आहे. निशा तुझ्यामुळे मी स्माईल करु शकतेय. थँक्यू मेरी जान…

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबतच्या नातेसंबंधाची घोषणा झाल्यापासून अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं जात होतं. त्यानंतर तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टद्वारे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता एवढ्या कालावधीनंतर मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांच्या मिळालेल्या प्रेमाला प्रतिसाद देत अभिनेत्रीने तुम्हा सर्वांचे प्रेम मी अनुभवू शकते असं सांगितलं, तसंच तिच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.Source link

Leave a Reply