Headlines

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा | Sushma Andhare joins shiv sena uddhav thackeray given responsibility of Deputy Leader



शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे कायदेशीर लढाई सुरु असताना दुसरीकडे दोन्ही गटांमध्ये वेगवेगळे नेते प्रवेश करत आहेत. आज मुंबई येते फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोबवली. त्यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले आहे. ठाकरेंनी ही घोषणा सर्वांसमोरच केली आहे.

हेही वाचा >>> “धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”

सुषमा अंधारे या फुले-शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या आहेत. त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी आपल्या सर्वांचा एकच संवैधानिक शत्रू असेल, तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. सुषमा अंधारे याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता.

हेही वाचा >>> शिवसेनेत मोठे बदल होणार? “सामान्यातून असामान्य माणसं घडवण्याची वेळ” म्हणत उद्धव ठाकरेंचे सूतोवाच

“शिवसेनेत काय जबाबदारी असेल. कोणतं लाभाचं पद असेल, असे मला विचारले जात आहे. पण माझ्या डोक्यावर ईडीच्या फाईलींचं ओझं नाही. किंवा अमित शाहा यांनी कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. मी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून लौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिसैनिकाच्या घरातील बहीण लेक होण्याचा मी प्रयत्न करेन. हीच जागा सर्वात मोठी आहे, असे मला वाटत आहे. नीलम गोऱ्हे माझ्यासाठी कायम आदर्श राहिलेल्या आहेत. त्या माझ्यासाठी आईसारख्या आहेत,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा >>> महाराष्ट्रात सत्तांतर होणार म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “त्यांना स्वप्नातच…”

तर दुसरीकडे “बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने अनेक सामान्य माणसांना असामान्य केलं. जे लोक असामान्य झाले ते शिवसेनेतून निघून गेले. आता परत एकदा सामान्यातून असामन्य माणसं घडवण्याची वेळ आली आहे. सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करतो,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचे शिवसेनेत स्वागत गेले. तसेच उद्धव ठाकरे यांनी मी अंधारे यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोबवतो, असेही सर्वांसमोर जाहीर केले.



Source link

Leave a Reply