sushma andhare criticized abdul sattar on statement regarding supriya sule spb 94शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याचा प्रकार उघकीस आल्यानंतर सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. सत्तारांना भाजपाचा गुण लागल्या असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण, म्हणाले “जरूर खेद व्यक्त करेन, परंतु…”

“संसदेच्या सदस्य असलेल्या आणि सातत्याने ‘संसद रत्न’ किताब मिळवत असलेल्या सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. अब्दुल सत्तारांवर कारवाई झाली पाहिजे. गुबाराव पाटील, अब्दुल सत्तार सातत्याने महिला राजकारण्यांवर ठरवून टीका करत आहेत. त्यांच्यावर आता कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्तारांनी आता राजीनामा दिला पाहिजे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

हेही वाचा – “आम्ही अल्टिमेटला घाबरत नाही; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान!

“हा भाजपाचा युएसपी आहे. भाजपा महिलांना दुय्यम वागणूक देते. त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन हीन दर्जाचा आहे. त्यामुळे भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक, त्यांनाही भाजपाचा गुण लागला आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तारांवर रोहित पवार संतापले

दरम्यान, औरंगाबादमध्ये आज एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता. सुप्रिया सुळेंनी खोक्यांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं विधान केले होते.Source link

Leave a Reply