Headlines

‘सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर…’, माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका

[ad_1]

Salman Butt on Suryakumar Yadav : श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी शतक ठोकल्यानंतर सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. सुर्यकुमार यादवने टी20 त तिसरे शतक ठोकले होते. या त्याच्या शतकाचे दिग्गज खेळाडूंकडून कौतूक करण्यात येत आहे. त्यात आता असा खेळाडू प्रत्येक संघात असावा व त्यांच्या त्यांच्या देशाकडून तो खेळावा अशी अपेक्षा अनेक माजी खेळाडू व्यक्त करत असताना पाकिस्तानच्या माजी खेळाडूची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रतिक्रियेची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.  

हे ही वाचा : सुर्यकुमार यादवला खुणावतोय ‘हा’ मोठा रेकॉर्ड, जाणून घ्या

टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या टी 20 तील तिसऱ्या शतकामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सुर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या खेळीने त्याने टी20 त तिसरे शतक ठोकले होते. या त्याच्या शतकानंतर भारतातच नव्हे तर जगभरात देखील त्याची चर्चा सूरू झाली होती. अनेक दिग्गज खेळाडू त्याचे कौतूक करतायत. त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने (Salman Butt) सुर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) कौतुक केलं आहे. तसेच सुर्यकुमार यादव जर पाकिस्तानात असता तर काय झालं असतं, हे सुद्धा त्यानं सांगितलं आहे. 

सुर्या राष्ट्रीय संघात पोहोचलाच नसता…

सलमान बटने (Salman Butt) सुर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) प्रतिक्रिया देताना मोठं विधान केले आहे. जर सुर्यकुमार यादव पाकिस्तानात असता, तर तो राष्ट्रीय संघात पोहोचूच शकला नसता, असे  सलमान बट म्हणाला आहे. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की,  आमच्या देशातील धोरणं काहिशी वेगळी आहेत, त्यामुळे सुर्यकुमारला (Suryakumar Yadav) राष्ट्रीय संघात खेळणं शक्य झालं नसल्याचं म्हणत त्याने क्रिकेट बोर्डावरच सडकून टीका केली आहे. 

काय म्हणाला सलमान बट?

मी एकेठिकाणी वाचलं होते की, सुर्याने वयाच्या 30 व्या वर्षी पदार्पण केले आहे. त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की ‘तो किती भाग्यवान आहे’ की तो भारतीय आहे, असे म्हणत सलमान बटने (Salman Butt) त्याचे कौतुक केले. तसेच जर सुर्या पाकिस्तानाता असता तर त्याला या वयात खेळण्याची, पदार्पणाची संधीच मिळाली नसती.कारण आमच्या देशात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना संघात पदार्पण करण्याची परवानगीच दिली जात नाही, असे म्हणत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली. 

सुर्याच्या यशाच गुपित  

सलमान बट (Salman Butt) हा एका युट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी सलमानने त्याच्या फलंदाजीच्या यशाचे गुपित सांगितले. सूर्यकुमारचा (Suryakumar Yadav) फिटनेस आणि माइंडसेट अप्रतिम आहे.तो प्रत्येक गोलंदाजाला त्यांच्या रणनीतीच्या आधीच ओळखतो, असे तो म्हणालाय. 

दरम्यान टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Surykumar yadav) शतक झळकावून धुमाकूळ घातला होता.सूर्याने आतापर्यंत वनडेत एकही शतक झळकावलेले नाही. सूर्या ज्या फॉर्ममध्ये दिसतोय, त्याप्रमाणे एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वनडेतील पहिले शतक झळकावू शकेल, अशी अपेक्षा क्रिकेट फॅन्स व्यक्त करतायत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *