Headlines

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्…

[ad_1]

Suryakumar Yadav career turning point : श्रीलंकेविरुद्ध (ind vs Sri) झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 51 चेंडूत 112 धावांची धुंवाधार खेळी केली. फिल्डर कुठं सेट करावा, असा प्रश्न श्रीलंकेच्या कॅप्टनला पडला होता. राजकोटच्या मैदानावर सूर्या नावाच्या वादळाने (suryakumar yadav century) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता एका मुलाखतीमध्ये सूर्यकुमार यादवच्या करियरच्या (suryakumar yadav career) टर्निंग पॉईंटवर भाष्य केलं. सूर्या जरी आज प्रसिद्धीच्या झोतात असला तरी एक काळ असा होता, ज्यावेळी त्याला संघर्ष करावा लागत होता.

भारत श्रीलंका सामन्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर (BCCI) केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं. त्यावेळी त्याने सूर्याला यो-यो टेस्टची (Yo Yo Test) आठवण देखील करून दिली. त्यावर सूर्याने त्याच्या आयुष्यातील विजयाचं रहस्य उलघडलं.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव ?

दोन वर्षांपूर्वी एनसीएमध्ये यो-यो चाचणी देताना सूर्या फसला होता, याची आठवण कोच द्रविडने करून दिली. त्यावर सूर्याने हसत हसत उत्तर दिलं. होय… मी रोलिंग करताना यो-यो टेस्ट पास केली होती. त्यामुळे हा माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट (Suryakumar Yadav career turning point) होता, असं सूर्याने यावेळी म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर…’, माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका

गेल्या वर्षी ज्या स्टाईलने आणि आनंद घेत मी खेळत होतो. त्याच पद्धतीने मी आत्ताही खेळलो. या सर्व करियरच्या यशामध्ये माझ्या परिवाराचा तसेच खासकरून माझ्या पत्नीचा (suryakumar yadav wife) सहभाग होता. तिने माझ्या डाएट प्लॅनवर भर दिला आणि मला मोलाची साथ दिली, असं सूर्यकुमार यावेळी म्हणाला आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका (IND vs SL ODI Series) यांच्यातील टी-ट्वेंटी सिरीजवर टीम इंडियाने कब्जा मिळवा आहे. त्यानंतर आता दोन्ही संघामध्ये वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता आगामी एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया कशी प्रदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *