Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा असाही कारनामा


मुंबई :  टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादव सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. सूर्याने नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामिगरी केली.  त्यांनतर झालेल्या न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्धच्या टी 20 मालिकेत खणखणीत शतकही ठोकलं. सूर्यकुमार या कडक कामगिरीच्या जोरावर 2022 या वर्षात आतापर्यंत टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. सूर्याने विशेष म्हणजे या खेळीदरम्यान अनोखा कारनामा केलाय. (team india batter suryakumar yadav most t 20 runs in 2022 832 runs  scored by four and sixes ind vs nz)

सूर्या टी 20 रँकिंगमध्ये सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थानी कायम आहे. सूर्याने या वर्षात 31 टी 20 सामन्यात 3 शतक आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने आणि 46.56 च्या सरासरीने 1 हजार 164 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे 1164 पैकी 832 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. या खेळीत सूर्याने 106 चौकार आणि 68 सिक्सचा समावेश आहे. शिवाय सूर्याने सिंगल-डबल आणि ट्रिपलच्या माध्यमातून 332 रन्स केल्या आहेत. या आकड्यांवरुन सूर्यकुमार किती आक्रमकपणे खेळलाय याचा अंदाज येतो.  

शुक्रवारपासून वनडे सीरिज

दरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. या मालिकेतील पहिल्या सामन्याला इडन पार्क ऑकलंड येथे सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेत धमाका केला. अशाच कामगिरीची आशा आता वनडे सीरिजमध्ये आहे. त्यामुळे सूर्याच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग, दीपक चहर आणि उमरान मलिक.

टीम न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर आणि टिम साउदी.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

25 नोव्हेंबर 1ली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर 2री वनडे, हॅमिल्टन
30 नोव्हेंबर 3री वनडे, क्राइस्टचर्चSource link

Leave a Reply