Surya Rashi Parivartan 2022 | चंद्रग्रहणाआधी वृषभ राशीत सुर्याचा प्रवेश; या राशीचं फळफळणार नशीब


मुंबई : सूर्य हा ग्रह नियम आणि अधिकार दर्शवतो. पुरुषांच्या कुंडलीत सूर्य वडिलांचे प्रतिनिधित्व करतो, तर स्त्री कुंडलीत तो पती दर्शवतो. 15 मे 2022 रोजी सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणाच्या एक दिवस आधी हा राशिचक्र बदल होणार आहे. सूर्याच्या या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना फायदा होईल. रविवार 15 मे 2022 रोजी सकाळी 5:45 वाजता सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल आणि 15 जून 2022 रोजी दुपारी 12.19 नंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.

या राशींसाठी सूर्याचे संक्रमण शुभ राहील

मेष – सूर्याच्या संक्रमणाचा काळ मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असणार आहे. तुमचे पेंडिंग काम पूर्ण होईल आणि तुमची मानसिक स्थितीही चांगली राहील.

मेष राशीच्या लोकांच्या पैशाशी संबंधित समस्या संपणार आहेत. नात्यातील कटुताही संपेल. 

वृषभ – या काळात तुमचा कल कुटुंबातील सदस्यांकडे राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना सूर्याचे हे संक्रमण अनुकूल आहे. सरकारी नोकरीसाठी नियोजन करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. या दरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कर्क – या काळात कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमचे पैसे कमावण्याचे स्रोत वाढवू शकतात किंवा नवीन स्रोत सापडू शकतात. नवीन नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. एकंदरीत सूर्याचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले राहील.

सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप महत्वाचे सिद्ध होईल. या काळात तुमची बढती होण्याची शक्यता आहे. या काळात लोक तुमच्याकडे किंवा तुमच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देतील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला खूप सन्मान मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.

धनु – सूर्याचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी खूप चांगले राहील. यावेळी भाग्य तुम्हाला साथ देईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूर्याचे हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये यश मिळवू शकता.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. करिअरमध्ये यश मिळेल. नवीन नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुम्हाला कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेल.

मीन – सूर्याचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. या काळात तुम्ही सहलीला जाण्याचा विचार कराल. याशिवाय तुमच्या कार्य कौशल्याचा विकास होईल. व्यापारी लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल.Source link

Leave a Reply