Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस


Surya Rashi Parivartan 2022 December: अनेक राशींवर काही दिवसात पैशाचा पाऊस पडणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सूर्य गोचर होत आहे. दुसऱ्या राशीत प्रेवश करणार असल्याने काही राशींच्या लोकांना धन संपत्तीचा लाभ होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य 16 डिसेंबर 2022 रोजी भ्रमण करणार आहे. सूर्य वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत सूर्याचा प्रवेश शुभ संकेत देत आहे. यासोबतच मकर संक्रांतीत 2023 पर्यंत विवाह, गृह प्रवेश करणे, मुंडण करणे, नवीन कामाला सुरुवात करणे यावर बंदी असेल. वास्तविक धनु राशीतील सूर्य शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. तथापि, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून, धनु राशीतील सूर्याचे संक्रमण 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. डिसेंबरमध्ये सूर्याच्या संक्रमणाने कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु होतील ते जाणून घेऊया. 

मेष-   मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर शुभ परिणाम देईल. परदेशात जाण्याची किंवा परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. प्रगती होईल, यश मिळेल. 

कर्क- सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत असल्याने कर्क राशीच्या लोकांना परीक्षा-स्पर्धा किंवा मुलाखतीत यश मिळेल. या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जुनी प्रकरणे निकाली निघतील. आर्थिक लाभ होईल. 

कन्या- डिसेंबर महिन्यात सूर्याचे गोचर कन्या राशींच्या लोकांसाठी आणि व्यावसायिकांना मोठा लाभ देईल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. संबंध अधिक चांगले होतील. 

वृश्चिक- सूर्याच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव मोठा असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांवर शुभ परिणाम राहील. सूर्य वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करेल. यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आदर वाढेल. 

धनु- या राशींच्या लोकांसाठी पैसाचा वर्षाव होणार आहे. सूर्य धनु राशीत भ्रमण करेल आणि या राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. पद-पैसा-सन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 Source link

Leave a Reply