Suresh Raina ची पुन्हा होणार CSK मध्ये एन्ट्री? 3 पराभवानंतर ‘ते’ ट्विट चर्चेत


मुंबई : आयपीएलच्या 2022 मध्ये 11 वा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्झ पंजाब किंग्ज असा खेळण्यात आला. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पंजाबने दिलेल्या 181 रन्सचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 126 रन्स करता आले. दरम्यान या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर रविंद्र जडेजा तसंच धोनी यांना जबाबदार धरलं आहे. शिवाय यावेळी त्यांना सुरेश रैनाचीही आठवण आली आहे.

CSK चाहत्यांना आठवला रैना

तिसऱ्या पराभवानंतर चाहत्यांनी सीएसकेला ट्रोल करत सुरेश रैनाची आठवण काढली आहे. एका युझरने एक फोटो पोस्ट करून, कमेंट्री बॉक्समधून रैना अशा पद्धतीने सामना पाहत असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने, चेन्नई सामना हरल्यानंतर काय करेल असं म्हणत एक मीम पोस्ट केला आहे.

याशिवाय अजून एका युझरने सुरेश रैनाला अजून एक संधी मिळाली पाहिजे, असं म्हटलं आहे.

आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये चेन्नईच्या नशीबात अजून एकाही विजयाचं सुख वाट्याला आलेलं नाही. यावेळी रविंद्र जडेजाने टॉस जिंकला आणि पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र चेन्नईचा डाव त्यांच्यावरच उलटला. पंजाबकडून शिखर धवन आणि लियम लिविंगस्टन तुफानी खेळी करत स्कोर 180 पर्यंत नेला. 

यानंतर 181 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे 4 प्रमुख फलंदाज पॉवर प्लेमध्येच पव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर शिवम दुबे आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यात 62 रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र या दोघांनाही टीमला विजय मिळवून देता आला नाही.Source link

Leave a Reply