Headlines

supriya sule replied to chandrashekhar bawankule statement on sharad powar black magic spb 94

[ad_1]

“शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता” असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केले होते. बावनकुळेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. दरम्यान, यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. वडीलधाऱ्या वक्तींबाबत अपशब्द बोलणे ही भाजपाची संस्कृती असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली, त्यांना मदत…”, जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“भाजपाचा दुटप्पीपणा स्पष्ट दिसतो आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री राजकीय कटुता संपली पाहिजे असं म्हणतात, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारे वक्तव्य करतात. त्यापेक्षाही दुर्दैव आहे की ते अंधश्रद्धेवर बोलतात. या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेकांनी काम केलं आहे. दोभाळकरांनी यासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांची हत्याही करण्यात आली होती. हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आम्हीही सातत्याने अंधश्रद्धेच्या विराधोत लढलो आहे. महत्त्वाचे म्हणजे वडीलधाऱ्या वक्तींबाबत अपशब्द बोलले ही भाजपाची संस्कृती असेल आमची नाही आणि महाराष्ट्राची तर मुळीच नाही”, असे प्रत्युत्तर ही त्यांनी दिले.

हेही वाचा – सुषमा अंधारे आणि तुम्ही वेगळे का झालात? विभक्त पती वैजनाथ वाघमारे म्हणाले, “कारण त्यांनी…”

नेमकं काय म्हणाले होते बावनकुळे?

साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली होती. “राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघणे सोडले पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी त्यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र आता आम्ही सतर्क झालो आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा विचार आता करू नये”, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. दरम्यान, जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण? असे विचारले असता, “ते भोंदूबाबा कोण, हे पूर्ण देशाला आणि राज्याला माहिती आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही”, असेही ते म्हणाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *