Headlines

भारतात येण्याआधी सनी लिओनला आला वाईट अनुभव; सांगितलं सत्य

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन (Sunny Leone) तिच्या सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय (Active) आहे. तुम्हाला माहिती असेलच की सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) काम करायची. त्यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या थेट अभिनेत्री म्हणून येण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्री सोडली. आणि नंतर त्यात कधी काम केले नाही

बॉलिवूडमधील अपयशानंतर सनी लिओनी सध्या साऊथमध्ये नशीब आजमावत आहे आणि तिथे चित्रपट करत आहे. सनीचा हॉरर कॉमेडी तमिळ चित्रपट ओ माय घोस्ट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. युवन यांनी केलं आहे. ओ माय घोस्टमध्ये सनीसोबतच दक्षिणेतील सतीश आणि योगी बाबूसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सनी भूतकाळातील योद्धा राणीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ओ माय घोस्टच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी बोलताना सनीने एक मोठा खुलासा केला आणि सांगितलं की, एकेकाळी ती भारतात यायला खूप घाबरत होती कारण ती 19-20 वर्षांची होती. त्यामुळे तिला तिथून अनेक धमक्या आणि घृणास्पद ईमेल येत असत.  भारतात पाऊल ठेवण्यापूर्वीच माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांशी माझा सामना झाला होता. असंही अभिनेत्री यावेळी म्हणाली.

”हा माझ्यासाठी खूप भीतीदायक अनुभव होता. असंही ती म्हणाली. या सर्व गोष्टींमध्ये तिने आपलं नाव करनजीत कौर वोहरा वरून बदलून सनी लिओन ठेवण्याचा निर्णय घेतला.  पेंटहाऊस मासिकाचे माजी प्रकाशक, बॉब गुचौने यांनी तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला. 2011 मध्ये सनी लिओनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. 40 वर्षांची सनी सध्या स्प्लिट्झविला हा टीव्ही शो होस्ट करत आहे.

सनीने पुढे सांगितलं की, ती या भारतीय ट्रोल्सपासून घाबरली होती आणि त्यांच्या धमक्यांचा इतकाच परिणाम झाला की, जेव्हा बिग बॉसची ऑफर पहिल्यांदा आली तेव्हा सनीने त्याला नकार दिला. भारतातील लोकांमध्ये आपल्या विरोधात प्रचंड द्वेष आहे असे तिला वाटू लागलं.

कॅनडामध्ये वाढलेल्या सनीने सांगितले की, जेव्हा तिने अमेरिकेच्या एडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा अनेक लोक तिच्यावर नाराज झाले. एडल्ट अभिनेत्री बनत असताना सनी फक्त 19 वर्षांची होती. सनीने पुढे सांगितलं की, ती एडल्ट स्टार  बनल्यानंतर तिला अनेक धमक्या येऊ लागल्या. अनेकांनी तिला भयंकर शिवीगाळ केली आणि तिला संपवण्याच्या धमक्याही दिल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *