फक्त शर्ट घालून सनी लिओनने केलं फोटोशूट; पुन्हा एकदा बोल्ड अवतारात आली समोर…


मुंबई : भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनीचं (Sunny Leone). सनी लिओनी चाहत्यांना करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

अभिनेत्री जवळजवळ दररोज Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत चाहतेही तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुतत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये सनीने फक्त शर्ट घातलेलं दिसत आहे. हा लूक खूप फ्लॉंट करत तिने एकामागून एक किलर पोज दिल्या आहेत.

सनी लिओनीचं ग्लॅमरस फोटोशूट 
या फोटोशूटसाठी सनीने शिमरी शर्ट घातला आहे जो एका बाजूला हिरवा आणि दुसऱ्या बाजूला लाल रंगाचा आहे. या सोबतच तिने हाय हिल्सही घातले आहेत.  

लाईट मेकअप आणि लाल लिपस्टिकसह  अभिनेत्रीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे. यासोबतच तिने  केस मोकळे सोडले आहेत.  कानात सोन्याचे झुमके घातले आहेत. या लूकमध्ये सनी खूपच सुंदर दिसत आहे.

सनी लिओनी वयाच्या 41 व्या वर्षीही हॉट दिसत आहे
सनीचा हा लूक पाहून अभिनेत्री 41 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही. तिने स्वत:ला अधिक फिट बनवलं आहे. ताज्या फोटोंमध्ये सनीच्या स्टाईलसोबतच तिची कर्वी फिगर पाहून सगळेच थक्क झाले आहेत. काही वेळातच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर लोकं तिच्या लूकवर कमेंट करुन तिचं भरभरुन कौतूक करत आहेत.

या चित्रपटांमध्ये सनी लिओन दिसणार आहे
जर आपण सनीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. लवकरच ही अभिनेत्री ‘रंगीला’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘वीरमादेवी’, ‘शेरो’, ‘कोका कोला’, ‘हेलन’ आणि ‘द बॅटल ऑफ बिमा कोरेगाव’मध्येही दिसणार आहे.Source link

Leave a Reply