सुंदर मी होणार… रिअॅलिटी शोमध्येच अभिनेत्रीनं घेतलं बोटॉक्स इंजेक्शन; आता नुसती चर्चा


मुंबई : अभिनेत्री किंवा कलाजगतामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच मंडळींची सौंदर्याशी असणारं समीकरण तसं जास्तच खास. सुंदर दिसण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापासून ते अगदी सौंदर्याच्या परिभाषा बदलणाऱ्य़ा काही संकल्पनांना आत्मसाद करण्यापर्यंत प्रत्येक वेळी ही मंडळी हिरीरिनं पुढाकार घेतना दिसतात. (Neelam Kothari botox)

सुंदर मी होणार… या एका ब्रीदाखाली आजवर आपल्या नैसर्गिक सौंदर्याला आणखी उठावदार करण्यासाठी कलाकार मंडळी काही सर्जरी किंवा इतर मार्गांचा वापर करतात.

सध्या एक अभिनेत्री अशाच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. 

ही अभिनेत्री आहे, नीलम कोठारी. Netflix Original Fabulous Lives of Bollywood Wives या रिअॅलिटी शोमधून ती नुकतीच झळकली. ज्यानंतर या शोबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. 

नेटफ्लिक्समधील या शोमध्ये नीलम बोटॉक्स इंजेक्शन घेताना दाखवण्यात आली आहे. तिला असं करायचं होतं, ज्यामुळं तिनं हा निर्णय घेतला. 

पण, या एका निर्णयानंतर तिच्याविषयीच्या बऱ्याच कमेंट एका नव्या वादाला तोंड फोडतात की काय, असा सूर आळवून गेल्या. 

आपल्याबाबतच्या या प्रतिक्रिया पाहता नीलम म्हणाली, ‘मला असं वाटतंय की बोटॉक्सच्या या संपूर्ण प्रक्रियेतून लोकं उगाचच चर्चांना वाव देत आहेत. एखाद्या दिवशी तुम्हीही म्हातारे व्हाल.

त्यावेळी चांगलं दिसण्यासाठी तुम्हीही असं काहीतरी करालच आणि असं का करु नये? लोकं कधीकधी अधिक गांभीर्याने विचार करतात असंच वाटतं. मुळात हे करण्यामध्ये मोठी गोष्ट काय? हा माझा विचार.’

आपण बोटॉक्स घेत असताना त्यासंदर्भात कॅमेरा क्र्यूला सांगितलं आणि त्यांनी ती संधी गमावली नाही, त्याचं चित्रीकरण केलं. यात लपवण्यासारखं काय होतं, असा सवाल तिनं उपस्थित केला. 

एकिकडे वेगवेगळ्या सर्जरी किंवा बोटॉक्स करत अभिनेत्री ही बाब सातत्यानं माध्यमं आणि चाहत्यांपासून लपवताना दिसतात पण, दुसरीकडे मात्र नीलमनं या समजुतीला शह देत जाहीरपणे आपण बोटॉक्स घेतल्याचं सांगितलं आणि सर्वांच्याच नजरा वळवल्या. Source link

Leave a Reply